उदयनराजेंनी दिली कै. लक्ष्मणराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट 

उदयनराजे म्हणाले, तात्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील योगदान नव्या पिढीला मार्गदर्शकच आहे. समाजात वावरताना विरोधासाठी विरोधी अशी भूमिका न ठेवता सर्वांना बरोबर घेऊन सर्व समावेशक विकासाला प्राधान्य दिले.
Udayanrajes visited  to the residence of Late Laxmanrao Patil
Udayanrajes visited to the residence of Late Laxmanrao Patil

सातारा : राष्ट्रवादीचे माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांच्या जयंतीनिमित्त आज खासदार उदयनराजे भोसले यांनी तात्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, राजेश पाटील, तात्यांची पत्नी श्रीमती सुमन पाटील उपस्थित होते.  जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी कै. लक्ष्मणराव पाटील यांच्या निवासस्थानी आज दिलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

 लक्ष्मणराव पाटील यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील योगदान नव्या पिढीला मार्गदर्शक असून सर्वांना सोबत घेऊन त्यांनी सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले. त्यांचे व्यक्तिमत्व निस्वार्थी आणि निष्कलंक होते, असे मत साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. 

उदयनराजे म्हणाले, तात्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील योगदान नव्या पिढीला मार्गदर्शकच आहे. समाजात वावरताना विरोधासाठी विरोधी अशी भूमिका न ठेवता सर्वांना बरोबर घेऊन सर्व समावेशक विकासाला प्राधान्य दिले.

दत्तानाना ढमाळ म्हणाले, बोपेगावचे सरपंच ते वाई तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, वाई पंचायत समिती सदस्य व सभापती, कृष्णा व्हॅली दुध पुरवठा संघाचे संचालक, वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य ते अध्यक्ष तसेच लोकसभा सदस्य, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे संचालक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अशा अनेक पदांवर काम करत तात्यांनी आपली कारकिर्द यशस्वी केली. जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी कै. लक्ष्मणराव पाटील यांच्या निवासस्थानी आज दिलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com