कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येचा उदयनराजेंनी अभ्यास करावा : शंभूराज देसाईंचा सल्ला - Udayanraje should study the growing number of patients in Corona: Shambhuraj Desai's advice | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येचा उदयनराजेंनी अभ्यास करावा : शंभूराज देसाईंचा सल्ला

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

जनतेच्या आरोग्यासाठी व कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा हा उपाय केलेला आहे. ही वस्तुस्थिती त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. अशा पध्दतीनेच केवळ रस्त्यावर उतरून भीक मांगो आंदोलन करणे उचित व योग्य नाही. 

सातारा : विकेंड लॉकडाऊनला जिल्ह्यात आणि राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. शासनाने आनंदाने लॉकडाऊन केलेले नाही. जनतेच्या आरोग्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा उपाय आहे. ही वस्तुस्थिती खासदारांनी समजून घेणे गरजेचे असून त्यांनी कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येचा अभ्यास करावा, असा सल्ला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिला आहे. 

राज्यातील विकेंड लॉकडाऊनविषयी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात विकेंड लॉकडाऊनला लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. ९५ टक्के लोक या लॉकडाऊनमध्ये सहभागी झाले होते. तसेच कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. खासदारांनी कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येचा थोडासा अभ्यास करणे गरजेचे आहे. शासनाने लॉकडाऊन आनंदाने केलेले नाही.

जनतेच्या आरोग्यासाठी व कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा हा उपाय केलेला आहे. ही वस्तुस्थिती त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. अशा पध्दतीनेच केवळ रस्त्यावर उतरून भीक मांगो आंदोलन करणे उचित व योग्य नाही. 
उदयनराजेंनी लॉकडाऊन उठविण्याची मागणी केली आहे, या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले हे भाजपचे खासदार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक घेतलेली आहे. या बैठकीस भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही या बैठकीस उपस्थित होते. या सर्वपक्षिय बैठकीत राज्याच्या हिताचाच निर्णय होणार आहे. यामध्ये जे ठरेल त्याचे जनतेने पालन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख