The two kings met; The problem of Kolhapur airport was solved ....
The two kings met; The problem of Kolhapur airport was solved ....

दोन राजे भेटले; कोल्हापूर विमानतळाचे प्रश्न मार्गी लागले....

राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर, कोल्हापूर विमानतळाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विमानतळाच्या विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली.

दिल्ली : नूतन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची आज कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. कोल्हापूर विमानतळाचे 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' असे नामकरण करण्याविषयी चर्चा झाली. यावेळी विद्यमान राज्य शासनाने पुन्हा एकदा तसा ठराव करून नव्याने प्रस्ताव पाठविल्यास लवकरच कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देऊ, अशी ग्वाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. The two kings met; The problem of Kolhapur airport was solved ....

करवीर छत्रपती घराण्याशी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राजर्षी शाहू छत्रपती महाराज व ग्वाल्हेरचे महाराज श्रीमंत माधवराव शिंदे हे अत्यंत जवळचे मित्र होते. श्रीमंत माधवराव शिंदे यांचे १९४० साली ग्वाल्हेर येथे स्मारक उभारल्यानंतर त्याचे अनावरण छत्रपती महाराजांच्या शुभहस्ते व्हावे, यासाठी श्रीमंत माधवराव शिंदे यांचे पुत्र व ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज श्रीमंत जिवाजीराव शिंदे यांनी शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांना निमंत्रित केले होते. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी स्मारकाचे अनावरण केले होते. 

आजही छत्रपती घराण्याशी ग्वाल्हेरकर शिंदे घराण्याचे मैत्रीपूर्ण संबंध टिकून आहेत. नुकतीच केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ज्योतिरादित्य शिंदे यांचे संभाजीराजे छत्रपती यांनी अभिनंदन केले. छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केलेल्या कोल्हापूर विमानळास महाराजांचे नाव देण्याची मागणी यावेळी केली. २०१८ साली महाराष्ट्र शासनाने तसा ठराव करून प्रस्ताव दिला होता. मात्र, विद्यमान राज्य शासनाने पुन्हा एकदा तसा ठराव करून नव्याने प्रस्ताव पाठविल्यास लवकरच कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर, कोल्हापूर विमानतळाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विमानतळाच्या विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली. कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडीगची सुविधा सुरू करण्यात येणारे अडथळे जलद दूर करावेत, अशी मागणी केली. तसेच, लवकरच याबाबतीत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, भारतीय विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर विमानतळ प्रशासन, कोल्हापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख यांचेसोबत बैठक घ्यावी, अशी मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अशी बैठक घेऊन सर्व विषय मार्गी लावू, असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com