सरसकट बंद ही जिल्हा प्रशासनाची मोगलाई; निर्णय बदला अन्यथा उद्रेक होईल : शिवेंद्रसिंहराजे

राज्य सरकारने एकदम सरसरकट बंद करणे योग्य नाही. त्यामुळे हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा लोकांत उद्रेक होईल, असा इशारा ही त्यांनी दिला आहे. व्यापारी वर्गाला विश्वासात न घेता जिल्हा प्रशासनाने निर्णय घेणे योग्य नाही. व्यापारी संघटनांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता तर योग्य झाले असते. केवळ कार्यालयात बसून निर्णय करणे व तो राबविणे यामुळे लोकांत नाराजी वाढत आहे.
Traders in Satara protest against the bandh says MLA Shivendraraje Bhosale
Traders in Satara protest against the bandh says MLA Shivendraraje Bhosale

सातारा : व्यापारी व व्यावसायिक सर्व प्रकारचा टॅक्स भरतात, परवानगी घेऊन व्यवसाय करतात. त्यांनाच कोरोना वाढत असताना बंदी करणे योग्य नाही. सरसकट बंदला साताऱ्यातील व्यापाऱ्यांचा विरोध आहे. कोरोना वाढतोय म्हणून सगळेच बंद करा हा जिल्हा प्रशासनाकडून मोगलाईचा प्रकार सुरू आहे. हे थांबविले पाहिजे. यापूर्वीच्या लॉकडाउनला व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी थांबायला तयार नाहीत. प्रत्येकाच्या नरड्याला आलेले आहे. जिल्हा प्रशासनाने अचानक सरसरकट बंद करणे योग्य नाही. हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा लोकांत उद्रेक होईल, असा इशारा साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. 

साताऱ्यात आजपासून ३० एप्रिलपर्यंत सर्व दुकाने व व्यावसाय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. या निर्णयाला सातारा शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध करत दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. यानंतर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. यासंदर्भात पत्रकारांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी संवाद साधला. 

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय हे मान्य आहे. पण सर्व दुकाने बंद ठेऊन कोरोना रोखला जाणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करून दुकानांमुळे रूग्ण वाढतात हे कुठे सिध्द झालंय. असे संशोधन झाले आहे का. केवळ कापड दुकानदारांना बंद ठेवणे हा विचित्र कारभार जिल्हा प्रशासनाने केलेला आहे. शनिवार व रविवारच्या राज्य सरकारच्या बंदला व्यापाऱ्यांचा पाठींबा आहे. पण जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता सगळेच बंद ठेवणे योग्य नाही.

आता गुढीपाडव्याचा सण आला असून व्यापाऱ्यांनी मालही भरलेला आहे. अशा परिस्थितीत दुकाने बंद ठेवणे योग्य नाही. प्रशासनाने बांधकाम व्यवसाय सुरू ठेवला आहे. पण त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने मात्र, बंद ठेवली आहेत. कोरोना वाढतोय म्हणून सगळेच बंद ही जिल्हा प्रशासनाची मोगलाई आहे. मागील लॉकडाउनमध्ये जिल्हा प्रशासनाला सर्व व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी सहकार्य केले आहे. पण आता आगामी गुढीपाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी थांबायला तयार नाहीत.

प्रत्येकाच्या नरड्याला आलेले आहे. राज्य सरकारने एकदम सरसरकट बंद करणे योग्य नाही. त्यामुळे हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा लोकांत उद्रेक होईल, असा इशारा ही त्यांनी दिला आहे. व्यापारी वर्गाला विश्वासात न घेता जिल्हा प्रशासनाने निर्णय घेणे योग्य नाही. व्यापारी संघटनांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता तर योग्य झाले असते. केवळ कार्यालयात बसून निर्णय करणे व तो राबविणे यामुळे लोकांत नाराजी वाढत आहे.

दुकाने बंद करून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेले चांगले

या सगळ्याचा प्रशासनाने फेरविचार करावा. व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मीही पालकमंत्र्यांशी बोलणार आहे. प्रशासनाचे निर्णयच ऐकायचे नाहीत, अशी भूमिका घेतली जाऊ शकतो. त्यातून काय होणार १४४ चे जमावबंदीचा आदेश मोडला म्हणून कारवाई होईल. दुकाने बंद करून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेले चांगले आहे, असा मुद्दाही शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com