'टॉप टेन' गुन्हेगारांवर मोक्कातंर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई

पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठीही प्रयत्न सुरू आहेत. नियोजन समितीतून पोलिस दलाला अडीच कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यातील 50 लाख निधी हा विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी ठेवण्यात आला आहे.
Top 10 criminals to be dealt with under Mocca Says Shivsena Minister Shambhuraj Desai
Top 10 criminals to be dealt with under Mocca Says Shivsena Minister Shambhuraj Desai

सातारा : जिल्हाच्या कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्या 'टॉप टेन' गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यांच्यावर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षभरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढल्याचेही त्यांनी नमुद केले. 

जिल्हा पोलिसांच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीची माहिती देताना शंभूराज देसाई म्हणाले, "जिल्हा पोलिसांची कामगिरी 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये चांगली झाली आहे. दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले आहे.

त्या तुलनेत गर्दी मारामारी, दुखापत व शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रमाण वाढले आहे. गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी हे प्रमाण 35.05 टक्के होते, ते 2020 मध्ये 58.41 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. गुन्हे कमी करण्यासाठी पोलिस दलाने प्रभावीपणे तडीपारी व मोक्‍याच्या कारवाया केल्या आहेत.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 'टॉप टेन'  गुन्हेगारांची पोलिस ठाण्यानिहाय यादी तयार केली आहे. त्यांच्यावर मोक्कासारख्या कायद्यातंर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.'' पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठीही प्रयत्न सुरू आहेत. नियोजन समितीतून पोलिस दलाला अडीच कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

त्यातील 50 लाख निधी हा विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी ठेवण्यात आला आहे. तसेच पोलिस दलाला दहा नवीन वाहनेही यातून खरेदी केली जाणार आहेत. येणाऱ्या अर्थसंकल्पात प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी एक नवीन गाडी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर तापोळा परिसरातील 52 गावे महाबळेश्‍वर पोलिस ठाण्याला जोडण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com