Today's birthday: Balasaheb Patil, Minister for Co-operation and Marketing and Guardian Minister of Satara | Sarkarnama

आजचा वाढदिवस : बाळासाहेब पाटील सहकार व पणन मंत्री तथा सातारचे पालकमंत्री 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 29 जुलै 2020

प्रभावी संघटन कौशल्य आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत तळमळ असलेला नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.

राडचे माजी आमदार कै. पी. डी. पाटील यांचे चिरंजीव असलेले बाळासाहेब ऊर्फ श्यामराव पाटील यांनी आपल्या वडिलांचा राजकारण आज समाजकारणाचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. 1999 पासून सलग चार पंचवार्षिक कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार असलेले बाळासाहेब पाटील हे स्वच्छ प्रतिमेचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहकार व पणन मंत्री पद तसेच साताऱ्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. प्रभावी संघटन कौशल्य आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत तळमळ असलेला नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.

कराड मतदारसंघात फेरबदल होऊनही त्यांनी आपल्या मतदारसंघावर पकड ठेवली आहे. 1996 पासून ते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. वेणूताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त, राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे सदस्य आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कराड विभागीय केंद्राचे अध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था यशवंतनगर चे अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संस्थापक अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे संचालक आहेत. त्यांची पी. डी.पाटील सहकारी बँक आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते स्वीकृत संचालक आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहकार व पणन मंत्री पद तसेच साताऱ्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. 

 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख