कुणी कामही देत नाही अन् भीकही; लॉकडाउनमुळे तृतीयपंथीयांचे हाल - Time of starvation on third Genders due to lockdown | Politics Marathi News - Sarkarnama

कुणी कामही देत नाही अन् भीकही; लॉकडाउनमुळे तृतीयपंथीयांचे हाल

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 मे 2021

आम्हाला स्वतःचे घर नसल्याने आम्ही भाड्याच्या घरात राहतो. सध्या खायलाच पोटभर मिळत नसल्याने एकवेळ जेवण करून कसे तरी जगत आहोत. यातच घर भाडे देणेसुद्धा सध्या शक्य नाही. भीक मागायला जावे तर सर्व बाजारपेठ बंद आहे. कोरोनाच्या भीतीने कुणी दाराही उभे करत नाही.

उदगीर : तृतीयपंथी म्हटले की, बहुसंख्य तिरस्कारातूनच त्यांच्याकडे पाहतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांना वागणूक मिळत नाही. कुणी कामही देत नाही. परिणामी, इच्छा नसतानाही तृतीयपंथीयांना भीक मागावे लागते. पण, सध्या लॉकडाउनमुळे बाजारपेठ ठप्प आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांना कुणी भीकही देत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, अनेक तृतीयपंथीयांकडे आधारकार्ड, रेशन कार्ड नाही. त्यामुळे त्यांना स्वस्त धान्य दुकानातून रेशनही उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

याबाबत अंजली पटेल यांनी सांगितले की, ''उदगीर येथे आम्ही पंचवीस  तृतीयपंथी आहोत. गतवर्षी तहसील कार्यालयामार्फत शिधापत्रिका देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, तहसीलदारांची बदली झाल्याने हा विषय पुढे आलाच नाही. उदगीरसह राज्यातील या तृतीयपंथीयांना शिधापत्रिका दिली तर किमान जेवणाची तरी सोय होईल. मागील वर्षांपासून सातत्याने टाळेबंदी आहे. त्यामुळेआमच्याकडील होती नव्हती ती सारी जमा पुंजी संपली. 

हेही वाचा : जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी शिवसेना आमदार तालुका प्रमुखांना देणार बक्षीस..

आम्हाला स्वतःचे घर नसल्याने आम्ही भाड्याच्या घरात राहतो. सध्या खायलाच पोटभर मिळत नसल्याने एकवेळ जेवण करून कसे तरी जगत आहोत. यातच घर भाडे देणेसुद्धा सध्या शक्य नाही. भीक मागायला जावे तर सर्व बाजारपेठ बंद आहे. कोरोनाच्या भीतीने कुणी दाराही उभे करत नाही. ही स्थिती केवळ उदगीरचीच आहे असे नाही तर सगळीकडे असेच आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे, साई फाउंडेशनच्या रुद्राली पाटील आणि अदिती पाटील यांच्यासह काही नागरिकांनी मदत केली. पण, सततचे लॉकडाउन पाहता शाश्वत मदत हवी आहे. शासनाने आधार नोंदणी आणि अंत्योदय शिधा पत्रिका द्यावी. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून आम्हालाही धान्य मिळेल.''

आम्हीही माणूस आहोत....
आम्हीही माणूस आहोत, आम्हालाही भाव-भावना आहेत. आम्हीही माणूस आहोत. भीक मागून जणने आम्हालीही आवडत नाही. पण, समाज आम्हाला कायम हीनतेची वागणूक देतो. अस्पृश्य समजतो. आम्हाला इतरांप्रमाणे समाज हक्क द्याव्या, असेही तृतीयपंथी म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख