या कारणांसाठी पृथ्वीराज चव्हाणांनी विधानसभेचे सभापती पद नाकारले.....

पूर्वीपासून काँग्रेसमध्ये एक नेता एक पद या तत्वानेच काम सुरू आहे. त्यामुळे महसूलमंत्री श्री. थोरात यांच्याकडे विधानसभेतील गटनेते, प्रदेशाध्यक्षपद व मंत्री पद अशा जबाबदाऱ्या आहेत. एका कोणत्याही पदाला न्याय देता येत नाही, असा काहींची सुर आहे. त्यामुळे त्या जबाबदारीचे विभाजन करावे का, या विषयाला धरून ती चर्चा सुरू झाली आहे.
For these reasons, Prithviraj Chavan refused the post of Speaker of the Legislative Assembly .....
For these reasons, Prithviraj Chavan refused the post of Speaker of the Legislative Assembly .....

कऱ्हाड : विधानसभेच्या सभापतीपदाबद्दल मला विचारणा झाली होती, असे पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी औपचारीक गप्पा मारताना स्पष्ट केले. मतदारसंघात काम करण्यासाठी व्यापक वेळ देता यावा, अधिकाधिक विकास करता यावा. सक्रीय सकारात्मक राजकारण करता यावे, यासाठी मी त्या पदाचा इन्कार केला होता, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत येत्या आठवडाभरात निर्णय होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. श्री. चव्हाण म्हणाले, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सध्या ती जबाबदारी आहे. मात्र श्री. थोरात मंत्रीमंडळातीलही महत्वाच्या पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी असल्याने त्या दृष्टीने पक्षाने त्यांच्या पदाबाबत विचार विनिमय सुरू केला आहे.

पूर्वीपासून काँग्रेसमध्ये एक नेता एक पद या तत्वानेच काम सुरू आहे. त्यामुळे महसूलमंत्री श्री. थोरात यांच्याकडे विधानसभेतील गटनेते, प्रदेशाध्यक्षपद व मंत्री पद अशा जबाबदाऱ्या आहेत. एका कोणत्याही पदाला न्याय देता येत नाही, असा काहींची सुर आहे. त्यामुळे त्या जबाबदारीचे विभाजन करावे का, या विषयाला धरून ती चर्चा सुरू झाली आहे.

त्यामागे प्रदेशाध्यक्ष बदलावे, असा कोणताही हेतू नाही. मुंबईत प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत त्याबाबत बैठक झाली आहे. त्यांनाही त्याची सगळी माहिती घेतली आहे. त्या बैठकीत विविध अन्य विषयावरही चर्चा झाली आहे. त्यामुळे केवळ प्रदेशाध्यक्षपदावर चर्चा झालेली नाही. तरीही त्याबाबत येत्या आठवडाभरात योग्य तो निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधानसभेच्या सभापतीपदाबद्दल मला विचारणा झाली होती, असे पुन्हा एकदा श्री. चव्हाण यांनी यावेळी गप्पा मारताना स्पष्ट केले. ते म्हणाले, मतदार संघात काम करण्यासाठी व्यापक वेळ देता यावा. मतदार संघाचा अधिकाधिक विकास करता यावा. सक्रीय सकारात्मक राजकारण करता यावे, यासाठी त्या पदाचा इन्कार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com