ग्रेड सेपरेटरप्रश्नी शंभूराज देसाईंकडून उदयनराजेंची पाठराखण...

मंत्री देसाई म्हणाले, ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाचा गुन्हा आहे का, याचा आम्हाला तपास करावा लागेल. कोणाची तक्रार असेल, तर ती तक्रार काय स्वरुपाची आहे, याचीही माहिती आम्हाला घ्यावी लागेल. उदयनराजेंनी उद्घाटनावेळी गर्दी जमवली, कोरोनाचे नियम तोडले अशी तक्रार असेल, तर त्याला वेगळे नियम आहेत. शासकीय प्रकल्पाचं उद्घाटन केलं असेल, तर त्यालाही वेगळे नियम आहेत.
 There is a possibility of a dispute over the grade separator.
There is a possibility of a dispute over the grade separator.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात कोणतीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही. ना पोलिस खात्याकडे, ना गृह खात्याकडे, ना जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाली. त्यामुळे जो पर्यंत कोणाची तक्रार येत नाही, तो पर्यंत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे स्पष्ट मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

साताऱ्यात गृह विभागाची माहिती देण्यासाठी आज तालुका पोलिस स्टेशन शेजारील शिवतेज हॉलमध्ये गृहराज्यमंत्री देसाई यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात त्यांना विचारले असतो श्री. देसाई यांनी यासंदर्भात कोणाचीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केल्याने उदयनराजेंची पाठराखण केल्याची चर्चा साताऱ्यात रंगली आहे. 

मंत्री देसाई म्हणाले, ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाचा गुन्हा आहे का, याचा आम्हाला तपास करावा लागेल. कोणाची तक्रार असेल, तर ती तक्रार काय स्वरुपाची आहे, याचीही माहिती आम्हाला घ्यावी लागेल. उदयनराजेंनी उद्घाटनावेळी गर्दी जमवली, कोरोनाचे नियम तोडले अशी तक्रार असेल, तर त्याला वेगळे नियम आहेत. शासकीय प्रकल्पाचं उद्घाटन केलं असेल, तर त्यालाही वेगळे नियम आहेत.

त्यामुळे तक्रारचं द्यायला कोणी पुढे येत नसेल, तर मग कारवाई कशी होणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात पोलिसांनी माहिती गोळा केलेली आहे. ती सर्व माहिती आमच्याजवळ आहे. त्या माहितीचा कशा पध्दतीने उपयोग करता येईल, याचा वरिष्ठ पातळीवर विचार करु, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

तसेच छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गाचा फलक फाटल्यावर भाष्य करताना ते म्हणाले, तो बोर्ड जाणीवपूर्वक कोणीही फाडलेला नाही. त्या भुयारी मार्गानजीकच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामुळे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे स्वत: उद्घाटन करुन भुयारी मार्ग खुला केला होता. तसेच कालही उदयनराजे यांनी शासकीय ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले होते, त्यामुळे ग्रेड सेपरेटरवरून वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com