तुमच्या आमदारांना सांगा.. सभागृहात मराठा आरक्षणावर बोला...

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षण, वसतीगृह, सारथी या सारख्या सवलतींचे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या केलेल्या पुर्नगठनाचे पुढे काय झाले? याचा गांभीर्याने विचार करा.त्यात सध्याच्या सरकारने थोडी जरी भर टाकली असती तर सोन्याहून पिवळे झाले असते, परंतु आता आहे तेच बंद पाडले आहे.
Tell your MLAs .. Speak on Maratha reservation in the House says Narendra Patil
Tell your MLAs .. Speak on Maratha reservation in the House says Narendra Patil

ढेबेवाडी : 'आरक्षणाबाबत एवढा अन्याय सुरू असताना तुम्ही गप्प का...? तुम्ही मराठा आहात की राजकीय मराठा? निवडणुकीवेळी तुम्ही तुमच्या आवडीच्या पक्षांबरोबर रहा पण आता राजकीय जोडे बाजूला ठेवून न्याय हक्काच्या लढ्यात उतरा. तत्पुर्वी तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांना फोन करून सभागृहात मराठा आरक्षणावर बोलायला सांगा', असे आवाहन
अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी काल (शनिवारी) रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना केले.

श्री. पाटील म्हणाले, 'आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी निगडित असलो तरी सर्वांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे आपण सर्वजण मराठा आहोत. आर्थिक निकषावर आधारीत आरक्षणासाठी वेगवेगळ्या संघटना १९८० पासून लढत आहेत. माझे वडील कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी त्यासाठी पहिले बलीदान दिले आहे. कोपर्डीच्या
घटनेनंतर सर्व मराठा समाज एकवटला.

५२ क्रांती मोर्चे निघाले. ४२ मराठा बांधवांनी बलिदान दिले. यापुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षण, वसतीगृह, सारथी या सारख्या सवलतींचे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या केलेल्या पुर्नगठनाचे पुढे काय झाले? याचा गांभीर्याने विचार करा. त्यात सध्याच्या सरकारने थोडी जरी भर टाकली असती तर सोन्याहून पिवळे झाले असते, परंतु आता आहे तेच बंद पाडले आहे.

मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात व्यवस्थित न मांडल्याने त्यास स्थगिती मिळाली आहे. तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांना फोन करून उद्यापासून (सोमवार) सुरू होणाऱ्या अर्थ संकल्पिय अधिवेशनात आरक्षणावर बोलण्याचा आग्रह धरा. तेथे त्यांनी मांडलेली बाजू लगेच जनतेपुढे जाहीर करायला आणि मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी सुरू असलेल्या  आंदोलनात त्यांना सहभागी होण्यासही सांगा.

पाटण येथे सुरू असलेल्या आंदोलनात उद्या (सोमवारी) मी माझ्या मंद्रुळकोळे गावच्या  ग्रामस्थांसमवेत सहभागी होणार आहे.कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून प्रत्येक तालुक्यात अशी ठिय्या आंदोलने सुरू करून सरकारचे आरक्षणाकडे लक्ष वेधा'.


काय म्हणाले नरेंद्र पाटील ...

* अनेक राजकारणी जाड कातडीचे असतात.
 जनतेतून सभागृहात गेल्यावर प्रश्नच विसरून जातात.

* अण्णासाहेब पाटील यांच्यासह ४२ समाज बांधवांचे बलिदान व क्रांती मोर्चाचे श्रम वाया जावू देणार नाही.

* एक लाख मराठा उद्योजक तयार केल्याशिवाय हा अण्णासाहेबांचा मुलगा स्वस्थ बसणार नाही.

* यापुर्वी आंदोलनात उतरलेले अनेकजण आता गप्प का आहेत..

* तुम्ही मत दिलेल्या प्रत्येक आमदारांना आरक्षणावर बोलते करा.

* प्रत्येक तालुक्यात ठिय्या आंदोलन सुरू करा
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com