सदाभाऊ खोत यांच्या मुलाकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण... - Swabhimani activist beaten by Sadabhau Khot's son ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

सदाभाऊ खोत यांच्या मुलाकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांनी संबंधित हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करत अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह चौघांनी वाळवा तालुक्यातील तांबवे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता रविकिरण माने याला घरात घुसून चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविकिरण राजाराम माने (वय ३५) यांनी कासेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. कासेगांव पोलिसात सागर खोतसह चौंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Swabhimani activist beaten by Sadabhau Khot's son ...

हेही वाचा : शिवसेना तालुकाप्रमुखावर गुन्हा दाखल

रविकिरण माने यांनी कासेगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाळवा तालुका युवक आघाडीचा मी अध्यक्ष आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातुन शेतकरी आंदोलन व संघटनेचे काम करतो. या कारणाने रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते माझ्यावर चिडुन होते. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचेवर शेतकरी हितावरुन टीका केल्याचा राग मनात धरून माझ्यावर हल्ला केला आहे. 

आवश्य वाचा : कोरोना वादळात उरलय फक्त एक सून, तिची दोन पिले आणि आयुष्यभर न फिटणारे कर्ज

''तु सदाभाऊंच्यावर टीका करतोस. तुला मस्ती आली आहे", असे म्हणून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी संबंधितांनी दिली आहे. त्यावेळी भास्कर विष्णु मोरे व विश्वास वसंत जाधव यांनी विरोध केला. परंतु, चौघांनी धक्काबुक्की करुन ढकलून दिले. आरडाओरडा केल्यानंतर ते घरातुन बाहेर गेले. या घटनेची तक्रार कासेगांव पोलिसात दिली आहे. 

याबाबत कासेगाव पोलिसांत घरात घुसून मारहाण करणे, जाणीव पूर्वक मारहाण करणे, शांतता भंग करणे व धमकावणे असे विविध गुन्हे दाखल झाले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांनी संबंधित हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करत अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख