आमदारांचे निलंबन अन्यायकारक; भास्कर जाधवांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीला काळिमा फासला...

या सरकारला आजिबात दया माया नाही. निर्ढावलेले आघाडी सरकार सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार जबाबदारी झटकत आहे.
आमदारांचे निलंबन अन्यायकारक; भास्कर जाधवांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीला काळिमा फासला...
Suspension of MLAs is unjust; Bhaskar Jadhav has tarnished the dignity of the chair of the presidency ...

बिजवडी : आपली मंत्रीपदाची खुर्ची कधीही जाईल, या भितीने वसुलीआघाडी सरकार फक्त खिसे भरायचे काम करत आहे. सर्वसामान्य जनतेच्या,
शेतकऱ्यांच्या, मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी पावसाळी अधिवेशन गुंडाळण्याचा कारनामा या सरकारने केला आहे. सभागृहात न घडलेल्या गोष्टी हेतू पुरस्कर जनतेसमोर नेत भाजपाच्या १२ आमदारांचे अन्यायकारक निलंबन करुन भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीला काळिमा फासण्याचे काम केले आहे, असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी केला. Suspension of MLAs is unjust; Bhaskar Jadhav has tarnished the dignity of the chair of the presidency ...

आघाडी सरकारच्या दडपशाही विरोधात भाजप आणि मित्रपक्षांच्यावतीने मुंबई येथे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आयोजित अभिरुप विधानसभेत ते बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, आघाडी सरकारने सगळे नियम धाब्यावर बसवून अधिवेशनात जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, आरक्षणाच्या प्रश्नावर बोलण्यास विरोधी पक्षांना बंदी घातली आहे.

पावसाळी अधिवेशन कशा प्रकारे गुंडाळता येईल, मराठा, ओबीसी आरक्षण प्रश्न कसे प्रलंबित राहतील, विरोधी पक्षाची कशी अडवणूक करता येईल हे सर्व ठरविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना अधिवेशनाच्या अगोदर पाच तास कॅबिनेटची बैठक घ्यावी लागली. सभागृह सुरु होताच ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न अंगलट येताच मंत्रीपदासाठी ओबीसी समाजाचा उपयोग करुन घेणाऱ्या छगन भुजबळ यांची ढाल करुन सरकारने पळवाट शोधली. भुजबळांनीही सरकारचा चेहरा वाचवायचे काम केले. 

आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही. शेतकऱ्यांचे वीजबील माफ करायचे सोडाच उलट शेतीपंपांचे वीज जोड तोडण्याचे काम सरकारने केले. आता तर गावेच्या गावे आंधारात असून गावांचा पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. या सरकारला अजिबात दयामाया नाही. निर्ढावलेले आघाडी सरकार सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार जबाबदारी झटकत आहे.

भास्कर जाधवांनी सभागृहात न घडलेल्या खोट्या गोष्टी सांगून भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करुन अध्यक्षपदाच्या खूर्चीचा अपमान केला आहे. प्रत्येक मंत्र्याला आपली खुर्ची कधीही जाईल याची भिती वाटत असल्याने खुर्चीत असेपर्यंत प्रत्येकजण स्वतःचा खिसा भरायचे काम करत आहे. राज्य चालविण्याची क्षमताच या सरकारमध्ये नसल्याचा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला.

पश्चिम महाराष्ट्रातून आमदार गोरेंना बोलण्याची संधी...

भाजपच्या अभिरुप विधानसभा सभागृहात मोजक्याच आमदारांना बोलण्याची संधी देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातून आमदार जयकुमार गोरेंना बोलण्याची संधी माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मिळालेल्या संधीचे सोने करत आमदार गोरेंनीही विरोधी पक्षाची बाजू जोरदारपणे मांडली. फडणवीस यांनी अनेक वेळा आमदार गोरेंच्या भाषणाचा उल्लेख केला. काल निलंबित करण्यात आलेल्या भाजपाच्या १२ आमदारांमध्ये आमदार गोरेंचे नाव शोधणाऱ्या सातारा जिल्ह्यातील काही रमलशास्त्र्यांना आज चांगलीच चपराक बसली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in