नऊ महिने फरार ग्रामविकासचा निलंबित सचिव अखेर पोलिसांच्या जाळ्यात 

12 जानेवारी 2020 रोजी दिवशी बुद्रुक गावात निलंबित अव्वल सचिव भरत आत्माराम पाटील याने तीन मित्रांच्या सहाय्याने शेतीच्या कारणावरुन त्याच गावातील पांडुरंग विठ्ठल सुर्यवंशी व सदाशिव महादेव सुर्यवंशी यांना मारहाण केली होती. त्याचवेळी रिव्हॉल्वरचा धाक धाकवुन जीवे मारण्याची धमकी दिली होती.
The suspended secretary of rural development, who had been absconding for nine months, was finally caught by the police
The suspended secretary of rural development, who had been absconding for nine months, was finally caught by the police

पाटण : पिस्तुल रोखुन जीवे मारण्याची धमकी देणारा व गुन्हा नोंद झाल्यानंतर गेली नऊ महिने फरार असलेला दिवशी बुद्रुक (ता.पाटण)
येथील रहिवाशी व मंत्रालयातील ग्रामविकास विभागाचा निलंबित अव्वल सचिव भरत पाटील याला पोलिसांनी शनिवारी सातारा येथे सापळा रचुन ताब्यात घेतले होते. त्याला 17 जानेवारीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. काल (मंगळवारी) त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 12 जानेवारी 2020 रोजी दिवशी बुद्रुक गावात निलंबित अव्वल सचिव भरत आत्माराम पाटील याने तीन मित्रांच्या सहाय्याने शेतीच्या कारणावरुन त्याच गावातील पांडुरंग विठ्ठल सुर्यवंशी व सदाशिव महादेव सुर्यवंशी यांना मारहाण केली होती. त्याचवेळी रिव्हॉल्वरचा धाक धाकवुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

याबाबत त्याचदिवशी भरत पाटील याच्या विरोधात पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर भरत पाटील फरारी झाला होता. मात्र, त्याचे मारुल हवेली येथील निवास्थानातुन 12 एमएम बोरचे रिव्हॉल्वर व 16 काडतुसे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरिक्षक तृप्ती सोनवणे यांच्या पथकाने जप्त केली होती. फरारी झालेला संशयित गेली नऊ महिने पोलिसांना गुंगारा देत होता.

परंतु, 16 जानेवारी रोजी त्याच्या सातारा येथील निवासस्थानातून पाटण पोलिसांनी भरत पाटील याला ताब्यात घेतले होते. 17 जानेवारीला पाटण येथील न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. काल (मंगळवारी) पोलिस कोठडीची मुदत सपल्यानंतर पुन्हा पोलिसांनी भरत पाटील यास न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहेत. अधिक तपास पोलिस निरिक्षक एन. आर. चौखंडे करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com