"नाणार'बाबत प्रभूंनी मौन सोडावे : डॉ. जयेंद्र परुळेकर

नाणार प्रकल्पाला सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधील तेथील आठ ग्रामपंचायतीचा विरोध आहे. त्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. या तीनही ग्रामपंचायतीवर नाणार विरोधी असलेले संघर्ष समितीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबत नागरिकांचा विरोध मावळला, असे समजणे चुकीचे ठरू शकते.
Suresh Prabhu should break silence about 'Nanar' says Dr. Jayendra Parulekar
Suresh Prabhu should break silence about 'Nanar' says Dr. Jayendra Parulekar

सावंतवाडी : "शिळ्या कढीला ऊत आणून' आणि रोजगाराचे गाजर दाखवून नाणार सारखा कोकणच्या जैवविविधतेला धोकादायक असलेल्या प्रकल्पाचे समर्थन काही पक्षाचे प्रमुख आणि स्थानिक पदाधिकारी करीत आहेत. विधानसभा संपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणारबाबत बोलताना या प्रकल्पाला नाणार ऐवजी ग्रीन रिफायनरी म्हणा, असे सांगून हा प्रकल्प कोकणात होणार नसल्याचे सूचक विधान केले. तरीही चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीचे निकटवर्तीय सुरेश प्रभू यांनी नाणारबाबत मौन सोडून भूमिका मांडावी, असे मत शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी येथील पालिका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर, दिपाली सावंत उपस्थित होते. यावेळी डॉ. परुळेकर म्हणाले, "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना काळात वाढलेल्या बेरोजगारीबाबत सरकारकडे मुद्दे मांडले. यात कोकणातील बेरोजगारीबाबत बोलताना नाणार प्रश्‍नांचे त्यांनी समर्थन केले.

विधानसभेची सभा संपल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नाणारबाबत प्रश्‍न विचारला असता हा नाणार प्रकल्प नसून त्याचे नाव ग्रीन रिफायनरी म्हणा असे सांगितले. यावरून नाणार प्रकल्पाबाबत त्यांचा विरोध कायम असल्याचे त्यांनी यावेळी दाखवून दिले. ते म्हणाले, "नाणार प्रकल्पाला सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधील तेथील आठ ग्रामपंचायतीचा विरोध आहे. त्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या.

या तीनही ग्रामपंचायतीवर नाणार विरोधी असलेले संघर्ष समितीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबत नागरिकांचा विरोध मावळला, असे समजणे चुकीचे ठरू शकते. नाणार प्रकल्प म्हणजे केवळ पैशाचाच कारभार आहे. कोकणातून चारवेळा लोकसभा निवडून आलेले नाणार प्रकल्पावरील मौन सोडून भूमिका मांडण्याची गरज आहे.

प्रभूंची भूमिका महत्त्वाची...

परुळेकर म्हणाले, श्री. प्रभू हे कोकणच्या विकासाबाबत सर्व जाणून आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मानले जातात. या प्रश्‍नावर त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. नाणार प्रकल्प हा रेड कॅटॅगरीतला आहे. हा प्रकल्प येथे आणावा, की न आणावा हा विचार करण्याची गरज आहे. कारण 2009 लोकसभा निवडणुकीत खासदार प्रभू हे लोकांना उद्देशून उभा सिंधुदुर्ग इकोसेन्सिटिव्ह करा असे बोलले होते. मग इकोसेन्सिटिव्ह जिल्ह्यात हा प्रकल्प कसा काय येऊ शकतो. 2009च्या त्या सभेत माजी खासदार निलेश राणे आणि विद्यमान आमदार नितेश राणे हे दोघे उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com