सुप्रिया सुळेंनी अनुभवली प्रितीसंगमावरील रम्य सायंकाळ.... - Supriya Sule visited the Samadhi of Yashwantrao Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

सुप्रिया सुळेंनी अनुभवली प्रितीसंगमावरील रम्य सायंकाळ....

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

खासदार सुळे तेथून परताना त्यांनी समाधिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या युवक, युवतींशीही संवाद साधला. त्यावेळी आजच्या पिढीतही ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलची उत्सुकता व आदर पाहून त्याही समाधानी झाल्या.

कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रातील कृष्णा-कोयना प्रीतिसंगमावरील सायंकाळचे वर्णन
वाचल्यानंतर त्याचा अनुभव घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे काल (शुक्रवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास येथील प्रीतिसंगमावर उपस्थिती
लावली. 

काही कार्यक्रमानिमित्त सुळे कोल्हापूरला गेल्या होत्या. तेथून परत जाताना त्यांनी कऱ्हाडला ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देऊन सायंकाळची अनुभूती घेतली. त्यांच्या समवेत लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, संजय पिसाळ, राहुल भोसले, सौ. खेतमर उपस्थित होते. 

कोल्हापूर येथून खासदार सुळे पुण्याला जाताना ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देण्याचे ठरवले. त्यानुसार सौरभ पाटील यांना त्यांनी निरोप दिला. त्यानुसार श्री. पाटील व त्यांचे सहकारी यांनी प्रीतिसंगमावर खासदार सुळे यांचे स्वागत केले. त्यानंतर सुळे कृष्णा काठावरील सायंकाळची अनुभूती घेण्यासाठी त्या समाधीस्थळाकडे गेल्या. कृष्णा काठावरील सायंकाळची अनुभूती घेतली. त्या वेळी त्यांनी तो परिसरही पाहिला. त्याची माहिती सौरभ पाटील यांच्याकडून घेतली.

त्या वेळी त्यांनी समाधिस्थळासमोरील सैदापूर व गोटे परिसराचाही विकास होण्याची गरज आहे. त्यानुसार त्याबाबत योग्य त्या खात्याला सूचना देण्यात येईल, असेही स्पष्ट केले. खासदार सुळे तेथून परताना त्यांनी समाधिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या युवक, युवतींशीही संवाद साधला. त्यावेळी आजच्या पिढीतही ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलची उत्सुकता व आदर पाहून त्याही समाधानी झाल्या.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख