शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; सातारा मेडिकल कॉलेजसाठी ५१० पदे भरणार

सातारा वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक अधिष्ठाता, पाच प्राध्यापक, १४ सहयोगी प्राध्यापक, एक मुख्य प्रशासकीय अधिकारी, १८ सहायक प्रशासकीय अधिकारी, ग्रंथपाल आदी एकूण ५१० पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली करून त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
Success in the pursuit of MLA Shivendraraje; 510 posts to be filled for Satara Medical College
Success in the pursuit of MLA Shivendraraje; 510 posts to be filled for Satara Medical College

सातारा : सातारा शासकिय मेडिकल कॉलेज उभारणीसाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. कॉलेजसाठीची जागा हस्तांतरण, १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणखी एक यश मिळाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे मेडिकल कॉलेजसाठी अधिष्ठाता, प्राध्यापक आदी एकूण ५१० पदांची निश्चिती करण्यात आली असून ही पदे भरण्यास राज्य शासने मान्यता दिली आहे. लवकरच ही पदे भरली जाणार असल्याने प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. 

सातारा वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून सातारा मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्‍न सोडवला. त्यावेळी वाढीव ६० एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेवरून सातारा येथे १०० विध्यार्थी क्षमतेचे  महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी बांधकामाच्या अंदाजपत्रकास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली. त्यासाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाखांच्या निधीला मंजुरी दिली होती. मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक असणारी पदे निर्मिती करावी आणि ही सर्व पदे भरून प्रत्यक्ष मेडिकल कॉलेज सुरु करावे अशी मागणीही शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती.

तसेच याबाबतचा पत्रव्यवहारही केला होता. प्रत्यक्ष कॉलेज सुरु होण्यासाठी आवश्यक पदांची निश्चिती आणि ती  भरण्यासाठी मान्यता मिळणे आवश्यक होते. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकानुसार विविध संवर्गातील ५१० पदे निर्माण करण्यास तसेच पदनिर्मिती, यंत्रसामग्री, उपकरणे, आवर्ती खर्च, बाह्यस्त्रोत खर्च व नव्याने अनुषंगिक शैक्षणिक रुग्णालय निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चास निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. 

या निर्णयामुळे सातारा वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक अधिष्ठाता, पाच प्राध्यापक, १४ सहयोगी प्राध्यापक, एक मुख्य प्रशासकीय अधिकारी, १८ सहायक प्रशासकीय अधिकारी, ग्रंथपाल आदी एकूण ५१० पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली करून त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. 

विकासकामांचा धडाका 
भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे कास धरण उंची वाढवण्याचा प्रश्न मार्गी लागला आणि सातारकरांचा पाणीप्रश्न कायमचा सुटला. हद्दवाढीला मंजुरी मिळवून त्यांनी सातारा शहरासह त्रिशंकू भागालाही विकासाच्या प्रवाहात आणले. बहुचर्चित मेडिकल कॉलेजचाही प्रश्न पूर्णतः मार्गी लावून जिल्हावासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवला. एकापाठोपाठ एक अशी विकासकामे मार्गी लावून शिवेंद्रसिंहराजे यांनी विकसकामांचा धडाका सुरु ठेला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com