शिवसागर जलाशयात बोटिंग सुरू होणार; शंभूराज देसाईंचे प्रस्ताव देण्याचे आदेश 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जलवाहतूकीस अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देण्यास काही अडचण नसल्याचे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.
Submit a proposal to start boating in Shivsagar Reservoir says Minister Shambhuraj Desai
Submit a proposal to start boating in Shivsagar Reservoir says Minister Shambhuraj Desai

मुंबई : शिवसागर जलाशयातील बंद असलेला बोटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी गृह, वन आणि जलसंपदा विभागांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावा, असे आदेश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जलवाहतूकीस अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देण्यास काही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

शिवसागर जलाशयातील बंद असलेला बोटिंग व्यवसाय सुरू करण्याबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली. श्री. देसाई म्हणाले, कोयना जलाशय परिसर हा १९७२ च्या अधिसूचनेद्वारे प्रतिबंधित असल्याचे जाहीर करण्यात आले होते. याबाबत हे क्षेत्र प्रतिसिद्ध क्षेत्रातून वगळण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने गृह विभागाकडे मंत्रालय स्तरावर तात्काळ सादर करावा. याबाबत दोन्ही विभागांनी सहमती दर्शविली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील मंजूर व्याघ्र संवर्धन आराखड्यातील निसर्ग पर्यटन आराखड्यानुसार कोयना जलाशयातील मार्ग जलवाहतूकीस मंजूर करण्यात आले असल्याचे व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जलवाहतूकीस अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देण्यास काही अडचण नसल्याचे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

वन्यजीव विभाग व जलसंपदा विभाग यांनी स्थानिक नागरिकांना यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही श्री. देसाई यांनी दिली. धरणाच्या सुरक्षिततेला कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही. याबाबत पोलिस अधिक्षकांनी दक्षता घ्यावी. आवश्यक मनुष्यबळासाठी राज्य सुरक्षा मंडळ यांच्याकडे मागणी करावी.

वन्यजीव, जलसंपदा, गृह विभागाने याबाबत तात्काळ कार्यवाही करणेबाबतच्या सूचना संबंधितांना श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या. २००३ च्या जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयात आवश्यक ते बदल प्रस्तावित असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.यावेळी अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके, गृह विभागाचे प्रधान सचिव विनीत अग्रवाल, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधिक्षक अजय कुमार बन्सल, वन्यजीवचे उपसंचालक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com