निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा; गृहराज्यमंत्र्यांचे पोलिस प्रशासनाला आदेश... - Strictly enforce restrictions; Minister of State for Home Affairs orders police administration ... | Politics Marathi News - Sarkarnama

निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा; गृहराज्यमंत्र्यांचे पोलिस प्रशासनाला आदेश...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 एप्रिल 2021

बाजारपेठांमधील गर्दी हटविण्याचे काम पोलीस करीत आहेत. त्यांना महानगर पालिकांचे कर्मचारी, नगर परिषदांचे कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

सातारा : कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशावर कारवाई करुन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज पोलिस विभागाला केल्या.

गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय परिक्षेत्रीय पोलिस महानिरीक्षकांशी संवाद साधला. सध्या पोलिसही बाधित होत आहेत, या बाधित पोलिसांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोविड सेंटर सुरु करा, अशा सूचना करुन श्री. देसाई म्हणाले, त्यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्या.

तसेच जिल्हा नियोजनमधूनही निधी देण्यात येईल. बाजारपेठांमधील गर्दी हटविण्याचे काम पोलीस करीत आहेत. त्यांना महानगर पालिकांचे कर्मचारी, नगर परिषदांचे कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख