कोरोनाच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा; साताऱ्यात नवे ७८ बेडचे कोरोना सेंटर होणार    - Strictly enforce corona restrictions says Guardian Minister Balasaheb Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोनाच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा; साताऱ्यात नवे ७८ बेडचे कोरोना सेंटर होणार   

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही. यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरु आहे. या सेंटरमध्ये 78 ऑक्‍सिन बेड असणार आहेत. तर जिल्हा कोविड सेंटरमध्ये आणखीन 20 आयसीयु बेडची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे.

सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रिडा संकुलात 78 बेडची सुविधा उपलब्ध केली जात आहे. ब्रेक दी चेन अंतर्गत शासनाने जे निर्बंध घातले आहेत. त्याची जिल्ह्यात कडक अंमलबजाणी करा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली. 

जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरू आहे. या कामाची पहाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट उपस्थित होते. 

बैठकीत ऑक्‍सिजन बेड तसेच आयसीयु बेड वाढवण्याच्या सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्धतेची माहिती घेऊन ब्रेक दी चेन अंतर्गत जे निर्बंध घातले आहेत. त्याची जिल्ह्यात कडक अंमलबजाणी करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही.

यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरु आहे. या सेंटरमध्ये 78 ऑक्‍सिन बेड असणार आहेत. तर जिल्हा कोविड सेंटरमध्ये आणखीन 20 आयसीयु बेडची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढण्यावर शासनाचा भर असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख