साताऱ्यात दहा मेपर्यंत कडक निर्बंध, सर्व दुकाने बंद

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकिय विश्रामगृहात बैठक झाली.या बैठकीत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काही महत्वपूर्ण सूचना केल्या. लॉकडाऊन असूनही वाढत चाललेली गर्दी रोखण्यासाठी तातडीने कडक निर्बंध लागू करण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
Strict restrictions in Satara till May 10, all shops closed
Strict restrictions in Satara till May 10, all shops closed

सातारा : कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने साखळी तोडण्यासाठी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या (मंगळवार) पासून दहा मेपर्यंत सातारा जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मेडिकलची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत सकाळी सात ते अकरा यावेळेत घरपोच सुविधा देता येणार आहे. कृषी अवजारे व शेती उत्पादनाशी संबंधित दुकाने सकाळी सात ते अकरा यावेळेतच सुरू राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानातून दुपारी 12 ते रात्री आठ तर मद्यविक्री दुपारी 12 ते सायंकाळी पाच यावेळेतच घरपोच करता येणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकिय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काही महत्वपूर्ण सूचना केल्या. लॉकडाऊन असूनही वाढत चाललेली गर्दी रोखण्यासाठी तातडीने कडक निर्बंध लागू करण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. त्यानुसार सायंकाळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी नवे निर्बंध लागू केले. यामध्ये उद्या (मंगळवार) सकाळी सात पासून दहा मेपर्यंत हे कडक निर्बंध लागू राहणार आहेत.

 या कालावधीत सर्व किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, आदी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी विक्रीची दुकाने, पाळीव प्राण्याच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. या कालावधीत या दुकानांची घरपोच सेवा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. 

तसेच कृषी अवजारे व शेतीतील उत्पादनाशी संबंधित दुकाने सकाळी सात ते अकरा यावेळेतच सुरू राहतील. या दुकानांची घरपोच सुविधा सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू ठेवता येणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12 ते रात्री आठ यावेळेत सुरू राहतील. मद्य विक्रीबाबत दुपारी 12 ते सायंकाळी पाच यावेळेतच घरपोच सुविधा देता येणार आहे. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहिता, साथरोग अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असेही प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. 


 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com