Strict law should be enforced in Koyna like Mumbai city Says Shivsena Minister Shambhuraj Desai | Sarkarnama

मुंबई शहराप्रमाणे कोयनेतही कडक कायदा राबवा : शंभूराज देसाई 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 5 जुलै 2020

कोरोनामुळे सील झालेल्या गावातील जनतेला जीवनावश्यक वस्तुसह आरोग्य सुविधाची कोणतीच गैरसोय भासणार नसल्याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. कोयना विभागात कोरोनाची साखळी वाढु नये यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कोयनानगर वासियानी आठ दिवस कडकडीत बंद पाळावा

कोयनानगर (ता. पाटण) : कोयना विभागात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. ही चिंतेची बाब आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. कोयनावासियांनी स्वयंशिस्त पाळून कोरोनाला विभागातून हद्दपार करावे. आठ दिवस सगळे कोयनानगर पूर्णपणे बंद ठेवावे. जनतेला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुची दुकानदारांनी होम डिलव्हरी करावी, असे स्पष्ट करून गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी शहरात अनावश्यक फिरणा-या लोकांवर दिसता क्षणी कारवाई करावी. मुंबई शहरात जसा कायदा राबवला आहे, तो कायदा कोयनेत व ग्रामीण भागात राबवावा, असे आदेश त्यांनी दिले.

कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या कोयनानगरला गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्याच्यासोबत प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, गट विकासधिकारी मीना साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी आर बी पाटील आदी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, कोरोनामुळे सील झालेल्या गावातील जनतेला जीवनावश्यक वस्तुसह आरोग्य सुविधाची कोणतीच गैरसोय भासणार नसल्याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. कोयना विभागात कोरोनाची साखळी वाढु नये यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कोयनानगर वासियानी आठ दिवस कडकडीत बंद पाळावा. या काळात दुकानदारांनी नागरिकांना घरपोच सेवा दियावी. जिल्हा बाहेर जावून लगेच परत
येणा-यासाठी ई-पास सक्तीचा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका या कोरोना सर्वेक्षणाचे उत्तम प्रकारे करत आहेत हे काम करण्यासाठी त्यांना मास्क हँडग्लोज, या गोष्टी बरोबर पावसाळी भाग असणाऱ्या कोयना विभागात छत्र्या सुध्दा देण्यात याव्या अशा सूचना त्यांनी गटविकासधिकारी मीना साळुंखे व सभापती राजाभाऊ शेलार यांना केली. तर पाटण पंचायत समितीने यासाठी अर्थसंकपात तरतूद केली असल्याची माहिती
सभापती राजाभाऊ शेलार यांनी यावेळी दिली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, पाटण पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, माजी सदस्य हरीश भोमकर, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, माजी सरपंच शैलेंद्र शेलार, मनीष चौधरी, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे- सपोनी महेश भावीकट्टी

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख