मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरीत बोलणाऱ्या राणेंचे तोंड बंद करण्याची ताकद शिवसैनिकात....

आम्हाला शिवसेना पक्ष प्रमुखांनी शांत राहून आपत्तीच्या काळात जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण शांत आहोत.
Minister shambhuraj desai attack on Minister Narayan Rane
Minister shambhuraj desai attack on Minister Narayan Rane

सातारा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नारायण राणे यांना पात्रता नसतानाही मुख्यमंत्री पद मिळाले होते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरीत बोलणे थांबवावे. आम्ही संयमी आहोत हे लक्षात ठेवावे, त्यांना जशास तसे उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद करण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. Stop talking in unison about CMs; Shiv Sainiks have the power to silence Rane ....

दरम्यान, महिलांवरील अत्याचार व त्यांच्या सुरक्ष्िततेसाठी राबविलेल्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून अकरा तालुक्यातील अकरा मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत, असे ही त्यांनी सांगितले. महिला सुरक्षितता व त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठीचा पथदर्शी प्रकल्प अंमलबजावणीच्या स्तरावर आलेला आहे. याबाबतचा आढावा घेतल्यानंतर मंत्री देसाई यांनी आज शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे सुपूत्र सातत्याने मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका करत आहेत. याविषयी विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांविषयी सातत्याने एकेरीत बोलण्याचे श्री. राणे यांनी थांबवावे. शिवसेनेचे कार्यकर्ते संयमी आहेत. आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद करण्याची ताकद आमच्यात आहे. मी पहिल्यांदा शिवसैनिक व नंतर मंत्री आहे. आम्हाला शिवसेना पक्ष प्रमुखांनी शांत राहून आपत्तीच्या काळात जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण शांत आहोत. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीच्या पथदर्शी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून आता जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील दहा मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहे. एक महिन्यांचे हे प्रशिक्षण दिल्यानंतर ही ११० मुलींची टीम प्रत्येक शहरात, गावात जाऊन तेथील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणार आहेत. हा एक महिन्यांचा कार्यक्रम असेल. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून नाविण्यपूर्ण बाब म्हणून निधी उपलब्ध केला जाणार आहे. त्यापुढे तीन महिने हा प्रकल्प जिल्ह्यात राबविला जाईल.

त्यानंतर याचा सविस्तर अहवाल राज्य शासनाला पाठविला जाईल. त्यानंतर मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन हा प्रकल्प राज्यभर राबविला जाणार आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका पाटण तालुक्याला बसला आहे. त्यामुळे येथील लोकांचे तात्पुरते स्थलांतरण केलेले आहे. चांगली जागा पाहून त्यांचे कायमस्वरूपी पूनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी पुनर्वसन आराखडा तयार केला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याबाहेर स्थलांतरण होणार नाही. कोयनेतील संपूर्ण पूनर्वसन झाले असून केवळ काही धरणग्रस्तांना जमिनीचे वाटप राहिलेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 
 
देसाई ट्रस्टतर्फे मदतीचे वाटप
अतिवृष्टीत बाधित साडे चार हजार कुटुंबांना शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने संसारउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यापुढेही त्यांना मदत केली जाणार आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com