वांझोटे दौरे नकोत, सोल्युशन काढा; प्रश्नांना बगल दिल्यास संभाजी ब्रिगेडचे राज्यभर आंदोलन

सध्या आम्ही जी दिली आहे, ती मदत नाही. तर ते आमचे कर्तव्यच आहे. तोकड्या मदतीने प्रश्न सुटणार नाहीत, तो कायमचा सुटण्यासाठी आम्ही पाऊले उचलत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
वांझोटे दौरे नकोत, सोल्युशन काढा; प्रश्नांना बगल दिल्यास संभाजी ब्रिगेडचे राज्यभर आंदोलन
Statewide agitation of Sambhaji Brigade, ignoring the issues of flood victims

ढेबेवाडी : ''किडे-मुंग्या नव्हे, हाडा मासाची माणसे डोंगराखाली गाडली गेली आहेत. कुटुंबेच्या कुटुंबे उध्वस्त झाली आहेत, अशा परिस्थितीत वांझोटे दौरे काढून काही उपयोग होणार नाही. नेमके सोल्युशन शोधावेच लागेल. दरड व पुरग्रस्तांच्या प्रश्नी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार असून प्रश्नांना बगल दिल्यास महाराष्ट्रभर लढा उभारू.'' असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. Statewide agitation of Sambhaji Brigade, ignoring the issues of flood victims

ढेबेवाडी खोऱ्यात डोंगर खचल्याने स्थलांतरित झालेल्या विविध दुर्गम वाड्यावस्त्यातील नागरीकांपर्यंत आज संभाजी ब्रिगेडच्यावतीने जीवनावश्यक साहित्याची मदत पोहचविन्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधून विविध प्रश्न व समस्यांची माहितीही घेण्यात आली. त्यानंतर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. आखरे यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या प्रश्नी संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, '''फांद्या छाटण्यापेक्षा समस्येच्या मुळांवर घाव घालण्याची वेळ आता आली आहे. दरडी, डोंगर, धरणे यामुळे बाधित होणारांचे तात्काळ शंभरटक्के पुनर्वसन करा. सध्या शाळा, मंगल कार्यालये व अन्य ठिकाणी अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना ठेवले असले तरी त्या निवाऱ्यावर मर्यादा आहेत. शासनाने तात्काळ स्वतःची निवारा केंद्रे उभी करावीत. आपण हे अस्मानी संकट म्हणत असलो तरी काही मानवनिर्मित बाबीही त्यास जबाबदार आहेत. ''

डोंगर खोदून पवनचक्कीचे टॉवर व त्याच्याशी संबधित अन्य यंत्रणा उभारली आहे. निसर्गाला हानीकारक काही बाबी केल्याने हे संकट अंगावर आल्याचीही शक्यता असल्याने त्यांच्या चौकशी व कारवाईची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. येथे खचलेल्या डोंगरामुळे अडचणीत आलेल्यात अनेक धरणग्रस्तही आहेत. त्यांचाही प्रश्न २५ वर्षे का रेंगाळत ठेवला आहे?. शासनाने यामध्ये लक्ष न घातल्यास अतिवृष्टीग्रस्त व धरणग्रस्तप्रश्नी आम्ही राज्यभर लढा उभारू.

सध्या आम्ही जी दिली आहे, ती मदत नाही. तर ते आमचे कर्तव्यच आहे. तोकड्या मदतीने प्रश्न सुटणार नाहीत, तो कायमचा सुटण्यासाठी आम्ही पाऊले उचलत आहोत,  असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, सुहास राणे, विजय पाटील, सुयोग औंधकर, राजेंद्र कांबळे, श्रीकांत गिरी, शाहिदभाई कुरेशी, संतोष धामणकर, काकासाहेब कांबळे, बाबा सावंत, मिलिंद कदम, सुनील कोठावळे, मंगेश सोनवणे, दत्ता कोळेकर, मनोज पाके, नाना महाडिक आदी उपस्थित होते. शंकरराव पवार (गुरुजी) यांनी आभार मानले.

''दौरे काढून सुटणारा हा प्रश्न नाही, इतकी वर्षे तो सुटलेलाही नाही. मायबाप सरकार योग्य पद्धतीने भूमिका बजावणार नसेल तर आम्हाला ती पुढे न्यावी लागेल. आमची टीम अतिवृष्टी बाधित गावोगावी, घरोघरी जावून नागरिकांशी संवाद साधून सर्व्हे करणार आहे''

- अॅड. मनोज आखरे  (प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड)

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in