राज्य सरकारचा रिमोट बारामतीत असल्याने ओबीसींचा मोर्चा तेथूनच 

या मोर्चावर राज्यासह बाहेरील राज्यातील ओबीसी नेत्यांची नजर आहे. या मोर्चाची दखल सरकारने घेतली नाही तरी राज्यभरात १० मोर्चा काढले जाणार आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.
Although the government did not take notice of this morcha, he also warned that 10 morchas would be organized across the state.
Although the government did not take notice of this morcha, he also warned that 10 morchas would be organized across the state.

सातारा : ओबीसींच्या आरक्षणाचा पहिला एल्गार मोर्चा येत्या २९ जुलैला बारामतीतून निघणार आहे. कारण या सरकारचा रिमोट बारामतीत असून सर्व सूञसंचालन तिकडूनच होत असल्याने ती जागा निवडली आहे. जोपर्यंत ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊन नये. मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करावा, असे अनेक आमदारांनी पत्रे दिली आहेत. पण, ओबीसीला मराठा आरक्षणाचा धक्का लागता कामा नये, असा इशारा भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. As the state government's remote is in Baramati, the OBC's march is from there

ओबीसी आरक्षणाबाबत त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसींचे राजकिय आरक्षण न्यायालयाने चार मार्चला रद्द केले. हे आरक्षण पुन्हा मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत. ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे. सारथीला जेवढा निधी द्याल त्यापेक्षा जास्त निधी ओबीसी समाजाला द्यायला हवा.

याबाबत सरकारने दुजाभाव करू नये. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी मागणी अनेक आमदारांनी पत्र पाठवून सरकारकडे केली आहे. ओबीसीला मराठा आरक्षणाचा धक्का लागता कामा नये. ओबीसी आरक्षणाबाबत संभाजीराजेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी. ओबीसींच्या राजकिय आरक्षणासाठी पहिला ओबीसी एल्गार मोर्चा येत्या २९ जुलैला बारामतीतून निघणार आहे. या मोर्चासाठी ओबीसींच्या सर्व
नेत्यांना आमंत्रित केले आहे.

प्रत्येकाने आपली भूमिका मांडावी, या मागची भूमिका आहे. ओबीसी आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या तीन अटींची पूर्तता करावी. इंपेरिकल डेडा, आयोगाची मागणी ही त्यातील प्रमुख मागणी असणार आहे. या मोर्चावर राज्यासह बाहेरील राज्यातील ओबीसी नेत्यांची नजर आहे. या मोर्चाची दखल सरकारने घेतली नाही तरी राज्यभरात १० मोर्चा काढले जाणार आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जागा सुटलेल्या आहेत. त्यात PSI  च्या दाोन गा सोडण्यात आलेल्या आहे. हा आमच्यावर घाला आहे. नोकरीतही आमचं नुकसान होत आहे. मोर्चा काढण्यासाठी बारामतीच का, या प्रश्नावर आमदार शेंडगे म्हणाले, कारण या सरकारचा रिमोट ही बारामतीत आहे. सर्व सूञसंचालन तिकडूनच होत असल्याने ती जागा निवडली आहे. फलटण, दौंड, इंदापूर यात ७० टक्के लोक ओबीसी आहे. त्यांना एकञ आणण्यासाठी बारामती योग्यस्थळ
आहे.  या मोर्चाला काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, संजय राऊत, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, या नेत्यांना आमंञण दिलं आहे. त्यांनी येण्याची कबूलीही दिली आहे
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com