संचालकांवर कारवाईऐवजी संस्थाच मोडित काढण्याचा सरकारचा डाव

या सर्व घटनेमागील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, असा सवाल उपस्थित होतो. या सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या फेर निवडणुका घेत सभासदांना संस्थेचा कारभार करणेसंदर्भांत निर्णय घेऊ दिला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
संचालकांवर कारवाईऐवजी संस्थाच मोडित काढण्याचा सरकारचा डाव
State government's ploy to demolish farmer-owned sugar factories

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँके द्वारे राज्यातील १२ सहकारी साखर कारखाने भाडे तत्वावर देण्यासाठी निविदा मागविण्याबद्दल जाहीरात काढण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मालकीच्या कारखान्यांचे नव्या स्वरुपातील खाजग़ीकरणाचा डाव शेतकरी हाणून पाडतील. वास्तविक संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे जर संस्था तोट्यात आली असल्यास सदर संचालकांवर कारवाई करण्याऐवजी संस्थाच मोडीत काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला आहे.  State government's ploy to demolish farmer-owned sugar factories

मुळात पहिल्यांदा सदर साखर कारखान्यांच्या तत्कालिन संचालकांची मालमत्ता जप्त करून बॅंकेने वसुली करावी. खाजगी संस्थानी या निविदा प्रक्रीयेत सहभागी होऊ नये, असे स्पष्ट करून माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, गंगापुर, जिजामाता, विनायक, शिवाजीराव पाटील निलंगेकर लातुर, डॉ. पद्मश्री वि.वि.पा लातुर, गजानन, बीड, पांझराखान धुळे, जयजवान लातुर, सांगोला सोलापुर, यशवंत पुणे, बापुराव देशमुख वर्धा, जय किसान यवतमाळ हे सहकारी साखर कारखाने दिर्घ मुदतीच्या कराराने भाडे तत्वावर देण्यासाठी राज्य सहकारी बँकेने निविदा काढल्या आहेत. 

श्री शेट्टी म्हणाले, पुण्याजवळील यशवंत सहकारी साखर कारखाना अवसायनात काढतांना राज्य सहकारी बँकेचे केवळ १८ कोटी रुपये थकित कर्ज होते. संस्थेची २४८ एकर जमीनीचे मुल्यांकन केवळ अडीच कोटी रुपये पकडुन संस्था बोगस रित्या दिवाळखोरीत काढण्यात आली. यशवंत कारखान्याच्या सभासदांनी एक रक्कमी कर्ज परतफेड योजनेतून भागभांडवल वाढवून कारखाना ताब्यात घेण्यासाठी तयारी दर्शविली. 

त्यासाठी बॅंकेत खाते उघडण्याची परवानगी मागितली पण त्यांना परवानगी न देता त्या विरुद्ध सभासद शेतकऱ्यांनी उच्च न्यायलयातून मनाई हुकुम घेतलेला असतांना देखील राज्य सहकारी बँक कारखाना भाडे तत्वावर देण्यासाठी अतिउतावळी का? या सर्व घटनेमागील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, असा सवाल उपस्थित होतो. या सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या फेर निवडणुका घेत सभासदांना संस्थेचा कारभार करणेसंदर्भांत निर्णय घेऊ दिला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in