पृथ्वीराज चव्हाणांना सोनिया गांधींचे बळ; भाजपला थोपविण्यासाठी दिली नवीन जबाबदारी  - Sonia Gandhi's power to Prithviraj Chavan; New responsibility given to stop BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

पृथ्वीराज चव्हाणांना सोनिया गांधींचे बळ; भाजपला थोपविण्यासाठी दिली नवीन जबाबदारी 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 मार्च 2021

आसाम विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून यानिमित्ताने पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षश्रेष्टींनी पुन्हा एकदा बळ दिले आहे. आसामची निवडणूक तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याचे मतदान २७ मार्चला होणार आहे.

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आसामच्या विधानसभा निवडणुकासाठी छाननी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आसाम राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार ही निवड झाली आहे. 

काँग्रेसने छाननी समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड झाली आहे. त्यांच्या सोबत कमलेश्वर पटेल, श्रीमती दीपिका पांडे सिंग, जितेंद्र सिंग, रिपून बोरा, देब्रता साइकिया, अनिरुद्ध सिंग, पृथ्वीराज साठे, विकास उपाध्याय आदींची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

दोन दिवसांत समितीची पहिली बैठक आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आसाम विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून यानिमित्ताने पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षश्रेष्टींनी पुन्हा एकदा बळ दिले आहे. आसामची निवडणूक तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याचे मतदान २७ मार्चला होणार आहे.

दुसऱ्या टप्प्याचे मतदान एक एप्रिलला तर तिसऱ्या टप्प्याचे मतदार सहा एप्रिलला होणार आहे. या निवडणूकीत भाजपला रोखण्यासाठी पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर ही महत्वाची जबाबदारी दिली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख