Some leaders from BJP will join NCP; Important leaders in Navi Mumbai in my contact
Some leaders from BJP will join NCP; Important leaders in Navi Mumbai in my contact

लवकरच भाजपमधून राष्ट्रवादीत इनकमिंग; नवी मुंबईतील महत्वाचे नेते माझ्या संपर्कात

नवी मुंबईच ऑपरेशन माझ्याकडे आहे, तिथे ही अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत, असे सांगून काही दिवसातच राष्ट्रवादी पक्षामध्ये भाजपमधून इन्कमिंग सुरू होणार आहे. माझ्याकडे नवी मुंबईची जबाबदारी दिल्याने तिथले अनेक महत्वाचे नेते माझ्या संपर्कातआले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याची खात्री आता विरोधकांना झाली आहे.

मुंबई : विरोधी पक्षातील काही मंडळी आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. अनेकजण राष्ट्रवादीमध्ये प्रवेशासाठी इच्छुक आहेत. काही दिवसात राष्ट्रवादीमध्ये भाजपमधून इन्कमिंग सुरू होईल. माझ्याकडे नवीमुंबईची जबाबदारी असल्याने तेथील अनेक महत्वाचे नेते माझ्या संपर्कात आहेत योग्यवेळी ते प्रवेश करतील, असे खळबळ उडवून देणारे विधान राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद व आमदार शशीकांत शिंदे यांनी नवी मुंबई येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे. 

नुकतीच आमदार शशीकांत शिंदे यांनी भाजपकडून त्यांना शंभर कोटी व मंत्रीपदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. अलिकडे शशीकांत शिंदे राजकिय वर्तूळात खळबळ माजवणारी विधाने करत आहेत. आत नवी मुंबईतील कार्यक्रमात त्यांनी आणखी एक खळबळ जनक वक्तव्य केले आहे. 

नवी मुंबईच ऑपरेशन माझ्याकडे आहे, तिथे ही अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत, असे सांगून  काही दिवसातच राष्ट्रवादी पक्षामध्ये भाजपमधून इन्कमिंग सुरू होणार आहे. माझ्याकडे नवी मुंबईची जबाबदारी दिल्याने तिथले अनेक महत्वाचे नेते माझ्या संपर्कात आले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याची खात्री आता विरोधकांना झाली आहे.

त्यामुळे विरोधी पक्षातील काही मंडळी आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते प्रवेश करतील. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने शशीकांत शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नेमकी कोणकोण मंडळी राष्ट्रवादीच्या गळाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com