सोमय्या यांनी बेछूट, बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग सुरू केलाय...

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोल्हापूर कोर्टात दिवाणी व फौजदारी असे दोन्ही स्वरुपाचे दावे दाखल करण्याचे स्पष्ट केले आहेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
सोमय्या यांनी बेछूट, बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग सुरू केलाय...
Somaiya has started a business of critisizing

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बेछूट व बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग सुरू केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. Somaiya has started a business of critisizing

ज्या संस्थेची किरीट सोमय्या बदनामी करत होते. त्या संस्थेने सोमय्या यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला असून शिवडी कोर्टाने तसे आदेश पारित केले आहेत. विनाकारण बदनामी करणार्‍या लोकांच्या विरोधात कायद्याने कारवाई करता येते हे लोकांच्या लक्षात आले असून ही आता सुरुवात आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोल्हापूर कोर्टात दिवाणी व फौजदारी असे दोन्ही स्वरुपाचे दावे दाखल करण्याचे स्पष्ट केले आहेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in