गेंड्याच्या कातडीचे मंत्री, सरकारने आत्मपरिक्षण करावे : चंद्रकांत पाटील - Social Justice Minister Dhananjay Munde should resign immediately after seeing the allegations against him Says BJP leader chandrakant patil | Politics Marathi News - Sarkarnama

गेंड्याच्या कातडीचे मंत्री, सरकारने आत्मपरिक्षण करावे : चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

श्री. पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेतर्फे कालच पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात धनंजय मुंढे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.  यापुढेही ही मागणी लावून धरली जाईल. त्यात भाजपचे प्रदेश पदाधिकारी सहभागी होतील.

उंडाळे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे त्यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. ज्या व्यक्तीच्या विरोधात आरोप होतात, त्या व्यक्तीला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो. पण गेंड्याच्या कातडीचे मंत्री व सरकार त्याबाबत आत्मपरीक्षण करतील का, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे मुंढे राजीनामा देतील असे वाटत नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

कै. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी श्री. पाटील उंडाळे येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेश चिटणीस अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, महेश बाबा जाधव यावेळी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेतर्फे कालच पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात धनंजय मुंढे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.  यापुढेही ही मागणी लावून धरली जाईल. त्यात भाजपचे प्रदेश पदाधिकारी सहभागी होतील. ज्या व्यक्तीच्या विरोधात आरोप होतात त्या व्यक्तीने पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो.

गेंड्याच्या कातडीचे मंत्री व सरकार त्याबाबत आत्मपरीक्षण करतील का, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे मुंढे राजीनामा देतील असे वाटत नाही. तरीही त्यांनी पदाचा राजीनामा तातडीने द्यावा, अशी आमची मागणी राहणार आहे. याशिवाय भाजपतर्फे राज्यभर उठाव करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख