तर सरकारमधून बाहेर पडू; एफआरफीचे तुकडे पडू देणार नाही.....   - So out of government; FRF will not allow fragmentation: Raju Shetty | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

तर सरकारमधून बाहेर पडू; एफआरफीचे तुकडे पडू देणार नाही.....  

सुनील पाटील
बुधवार, 28 एप्रिल 2021

एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना दोन ते तीन टप्प्यात एफआरपी देणे चुकीचे आहे. एफआरपीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी पिळवून तात्काळ थांबवली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा अभ्यास गट शेतकऱ्यांवर अन्याय करणार असेल तर संघटना अशा सरकारच्या मागे राहणार नाही, असेही श्री शेट्टी यांनी सांगितले. 

कोल्हापूर : उसाच्या एकरकमी एफआरपीसाठी कोणाशीही दोन हात करायची तयारी आहे. प्रसंगी सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला. निती आयोगाच्या शिफारशीनंतर राज्य सरकारनेही एफआरपी दोन ते तीन हप्त्यांत देण्यासंदर्भात अभ्यास गट तयार केला आहे. राज्यातील इतर निर्णय लवकर होत नसताना अभ्यास गटात तयार करण्यासाठी इतकी घाई का? असा सवालही श्री शेट्टी यांनी आज केला. 

श्री शेट्टी म्हणाले, राज्य सरकारची ऊसाच्या एफआरपीबाबतची भूमिका संशयास्पद आहे. शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना दोन ते तीन टप्प्यात एफआरपी देणे चुकीचे आहे. एफआरपीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी पिळवून तात्काळ थांबवली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा अभ्यास गट शेतकऱ्यांवर अन्याय करणार असेल तर संघटना अशा सरकारच्या मागे राहणार नाही, असेही श्री शेट्टी यांनी सांगितले. 

 मोफत लसीकरणाचं समर्थन 

राज्य शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याचे जाहीर केले आहे. हे कौतुकास्पद आहे. काही श्रीमंत व्यक्ती याचा गैरफायदा घेणार असतील तर घेऊ देत पण लस मोफत दिली पाहिजे. ही आपलीही भूमिका आहे. केंद्र सरकारने ही राज्यातील रुग्ण संख्येच्या तुलनेत लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख