तर भूजबळांनी सत्तेतून बाहेर पडावे; ओबीसी आरक्षणासाठी भाजप करणार चक्का जाम  - So Bhujbal should get out of power; BJP will jam Chakka for OBC political reservation says MLA Jaykumar Gore | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

तर भूजबळांनी सत्तेतून बाहेर पडावे; ओबीसी आरक्षणासाठी भाजप करणार चक्का जाम 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 21 जून 2021

जो पर्यंत ओबीसींचे आरक्षण पुन्हा देत नाहीत, मागावर्गीय पदोन्नतीचे आरक्षण पुर्नस्थापित करत नाही. तोपर्यंत या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आम्ही घेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सातारा : ओबीसींचे राजकिय आरक्षण OBC Political Reservation रद्द करण्यास राज्य सरकारच जबाबदार असून केवळ महारष्ट्रातच हे आरक्षण रद्द झालेले आहे. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष BJP येत्या २६ जुनला राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. जिल्ह्यातही भाजपचे आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. सत्तेत असलेले समता परिषदेचे नेते छगन भुजबळ Chhagan Bhujabal यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनाची नौटंकी करण्यापेक्षा त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हानही त्यांनी केले आहे. So Bhujbal should get out of power; BJP will jam Chakka for OBC political reservation says MLA Jaykumar Gore

आमदार गोरे यांनी शासकिय विश्रामगृहात आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे याला हे सरकारच सर्वस्वी जबाबदार असून टेक्निकल डाटा देऊ शकलेले नाही. आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने या सरकारला जाग आणण्यासाठी व तातडीने कार्यवाही करावी, यासाठी २६ तारखेला चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर एक हजार ठिकाणी आंदोलन होणार आहे. 

हेही वाचा : लोणावळ्यात मिटिंग घेण्यापेक्षा मंत्रालयात बसून ओबीसींचे प्रश्न सोडवा

राज्य शासन ओबीसींना आरक्षण देण्याची कार्यवाही करण्यापेक्षा सरकारमधील काही मंत्री आंदोलन करत आहेत. कायदेशीर प्रक्रिया पार न पडता समाजासमोर जाऊन आंदोलनाचे नाटक करत आहेत. वडेट्टीवार साहेबांनी मागासवर्गीय आयोग स्थापन करु असे सांगितले होते. तो अजून स्थापन झालेला नाही. या सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे समता परिषदेचे नेते आहेत. राजकिय आरक्षण हे देशातील गेलेले नाही, महाराष्ट्रातील गेलेले आहे.

आवश्य वाचा : प्रताप सरनाईकांच्या त्या आरोपाला राष्ट्रवादीच्या मुश्रीफांनी दिले उत्तर

त्यामुळे महाराष्ट्र सरकारची जशी जबाबदारी आहे तशी सरकामध्ये असल्याने भुजबळांचीही देखील आहे. पण ते रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची नौटंकी करत आहेत. समाजाचा वापर सत्तेसाठी करताना समाजासाठी काही देणं लागतो. पण सरकार त्यांचे ऐकत नसल्यानेच त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे. त्यांचा सरकारवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी सरकारमधून त्यांनी बाहेर पडावे व मगच आंदोलनाची भूमिका घ्यावी. 

या सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्यावतीने २६ जुनला आम्ही ओबीसी आरक्षणाचा विषय घेऊन आम्ही लढा उभारला आहे. त्याच पध्दतीने मराठा आरक्षणाबाबत ही त्यांनी हाच घोळ केलेला आहे. त्यांनी कोर्टात व्यवस्थित भूमिका मांडली नाही. टेक्निकल गोष्टी होत्या त्या समोर आणल्या नाहीत. गायकवाड आयोगाच्या अहवालाचे भाषांतर त्यांना करता आले नाही. न्यायालयात सरकार व्यवस्थित भूमिका मांडत नसल्याची नोंद कोर्टाने नोंदवली आहे.

मागावर्गीय समाजाचे पदोन्नतील असलेली आरक्षण मिळत नाही. हा प्रश्न हे सरकार व्यवस्थित हाताळत नाही. एकुणच सरकार मागासवर्गीयाबाबत उदासीनता असल्याने आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. जो पर्यंत ओबीसींचे आरक्षण पुन्हा देत नाहीत, मागावर्गीय पदोन्नतीचे आरक्षण पुर्नस्थापित करत नाही. तोपर्यंत या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आम्ही घेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. भाजपच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहोत. 

पालकमंत्री शोधावे लागताहेत.... 

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात जिल्हा प्रशासन व पालकमंत्री कमी पडले असे वाटते का, या प्रश्नावर आमदार गोरे म्हणाले, जिल्ह्यात १४ महिन्यांपासून कोरोनाची साथ आहे. ही सर्व मंडळी कुठे गेली होती. जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी ते कोणाचेही एकत नाहीत. पालकमंत्री कुठे आहेत, त्यांना शोधावे लागते. त्यांची जबाबदारी नाही का. कोरोनाच्या बैठकांना आम्हाला बोलावले जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख