कृष्णा कारखान्यात सहाशे सभासद बोगस; कऱ्हाड पोलिसात तक्रार दाखल

उपलब्ध कागदपत्रानुसार अपात्र व्यक्तींना सभासद करण्यात आले आहे. त्यातील बहुतांश व्यक्ती एका ट्रस्टचे कर्मचारी आहेत. यासंदर्भात सध्या कारखान्याकडून काही कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आलाआहे. यासंदर्भात गरज पडल्यास सुमारे ४५ गावातील तलाठ्यांकडूनही माहिती घेणे आवश्यक आहे.
Six hundred members bogus in Krishna factory; Filed a complaint with Karad police
Six hundred members bogus in Krishna factory; Filed a complaint with Karad police

कराड : कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे ६०० पेक्षा जास्त व्यक्तींना "अ"वर्ग सभासद करण्यात आले आहेत. या प्रकरणात कारखान्याची पात्र सभासदांची, त्यांच्या हक्कांची, अधिकाराची व कारखान्याच्या भवितव्याबद्दल गंभीर फसवणूक झाली असल्याबद्दल चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करणेत यावी अशी तक्रार कराड तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील तक्रारदार प्रशांत रंगराव पवार यांनी यासंदर्भात कराड तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीत
म्हटले की, ३० मार्च २०१६ ते २० ऑगस्ट २०१८ या काळात संचालक मंडळाच्या झालेल्या एकूण बैठकीतील १९ बैठकांमध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाने पात्र नसताना सुमारे सहाशेपेक्षा जास्त व्यक्तींना कारखान्याचे "अ" वर्ग सभासद केले आहेत.

सभासद होण्यासाठी कार्यक्षेत्रात कमीत कमी १० गुंठे पिकाऊ जमीन असणे आवश्यक आहे. तसेच संबंधीत व्यक्ती कुळ, सहहिस्सेदार, संरक्षित
कुळ असेल तर त्याची  ७/१२ उताऱ्यात नोंद असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ७/१२ वर कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सभासद होणाऱ्या व्यक्तीची नोंद असणे आवश्यक आहे.  महसुली दप्तरातील माहितीनुसार यादीतील व्यक्तींच्या नावे जमीन नाही.

एकत्र कुटुंब असल्यास तेवढे धारणक्षेत्र नाही. तरी वर उल्लेख करण्यात आलेल्या काळातील व जोडलेल्या यादीनुसार संबंधित व्यक्तींना देण्यात आलेले सभासदत्व कायद्यानुसार अयोग्य आहे. तसे पुरावे आमच्याकडे आहेत. तरी बोगस, बनावट कागदपत्रांच्या आधारे कृष्णा कारखान्याच्या
सभासदांची फसवणूक झाली आहे. बोगस सभासद करुन कारखान्याच्या अस्तित्व आणि भवितव्याविषयी शंका आहे.

उपलब्ध कागदपत्रानुसार अपात्र व्यक्तींना सभासद करण्यात आले आहे. त्यातील बहुतांश व्यक्ती एका ट्रस्टचे कर्मचारी आहेत. यासंदर्भात सध्या
कारखान्याकडून काही कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आला आहे. यासंदर्भात गरज पडल्यास सुमारे ४५ गावातील तलाठ्यांकडूनही माहिती घेणे आवश्यक आहे.

अपात्र व्यक्तींना कारखान्याचे सभासदत्व देण्यात आल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, शेअर कमिटीचे संचालक, कार्यकारी संचालक, सचिव यांची सखोल चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. याप्रकरणी
सर्व ते आवश्यक पुरावे तारीख, वार व सुस्पष्ट अभिप्रायासह आमच्याकडे असून त्याची मागणी केल्यास ते पोलिस ठाण्यात सादर केले जातील, असे तक्रारीत श्री. पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात कृष्णा कारखान्याच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात लवकरच कारखान्याची बाजू मांडली जाईल, असे सांगण्यात आले आहे. 

सहकार विभागाचे मार्गदर्शन घेणार....

कृष्णा कारखान्यात सहाशे सभासद बोगस असल्याची तक्रार कऱ्हाड तालुका पोलिस स्टेशनला दाखल झाली आहे. याबाबत चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच सहकार विभागाकडून मार्गदर्शन घेतले जाईल, असे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com