ब्रेकिंग : साताऱ्यात कोरोनामुळे सहा रूग्णांचा मृत्यू, बाधितांचा आकडा २२१३ वर

कोरोनाबाधितांचा आकडा २२१३ झाला असून त्यापैकी ९०८ रूग्णांचा विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असून दिवसभरात सहा जणांना मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८० जणांना बळी गेला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही कायम असून १२२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत २० हजार ६१६ संशयितांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
Corona Patients Increased In Satara District
Corona Patients Increased In Satara District

सातारा : कोरोनाची साखळी जिल्ह्यात तुटेनाशी झाली असून रात्री उशीरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 69 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. तब्बल सहा कोरेना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 

कोरोनाचा कहर सातारा जिल्ह्यात सुरूच असून दररोज ५० ते ७० रूग्ण सापडत आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा २२१३ झाला असून त्यापैकी ९०८ रूग्णांचा विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असून दिवसभरात सहा जणांना मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८० जणांना बळी गेला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही कायम असून १२२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत २० हजार ६१६ संशयितांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

 कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील असा आहे. जावली २६, वाई १९, सातारा तीन, कऱ्हाड तीन, खंडाळा सहा,  कोरेगाव सहा, खटाव एक, महाबळेश्वर तीन, पाटण दोन रूग्णांचा समावेश आहे.  जावली तालुक्यातील पसेवाडी येथील 40 वर्षीय महिला, बामणोली येथील 50 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 35, 61, 36, 70, 29, 30, 27, 25, 50, 90, 25, 39, 02, वर्षीय पुरुष, 28, 55, 27, 31, 11, 30, 55, 06, 25, वर्षीय महिला, मेढा येथील 13 वर्षीय पुरुष, सायगाव येथील 70 वर्षीय पुरुष. 

वाई तालुक्यातील भुईंज येथील 53 वर्षीय पुरुष, वाई येथील 37, 41 वर्षीय महिला. ब्राम्हणशाही येथील 45, 20, 48, 75, 40, 40 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, यशवंतनगर येथील 22, 8, 11, 6, 22 वर्षीय पुरुष, 20, 32, 9, वर्षीय महिला.  सातारा तालुक्यातील शेळकेवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, सातारा येथील 45 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 77 वर्षीय पुरुष.

 कराड तालुक्यातील सैदापुर येथील 60 वर्षीय महिला, शेणोली येथील 70 वर्षीय महिला, खूबी येथील 78 वर्षीय महिला.  खंडाळा तालुक्यातील खंडाळा येथील 45, 64 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, विंग येथील 27 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 60 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष.  कोरेगांव तालुक्यातील शिरंबे येथील 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 64, 37 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, चिमणगाव येथील 18 वर्षीय महिला.

खटाव तालुक्यातील नेर येथील 74 वर्षीय पुरुष,  महाबळेश्वर तालुक्यातील दापवडी येथील 2, 38 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय महिला.  पाटण तालुक्यातील कासणी येथील 53 वर्षीय पुरुष, कासरुड येथील 33 वर्षीय पुरुष, 

सहा बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे शेळकेवाडी (ता.सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष, नेर (ता.खटाव) येथील ७४ वर्षीय पुरूष, सातारा येथील ४५ वर्षीय पुरुषांवर कोरोना संशयित म्हणून उपचार सुरू होते. त्यांचा अहवाल कोरोनाबाधित असल्याचे अहवाल काल रात्री उशीरा प्राप्त झाला.

तसेच नेरले (ता. पाटण) येथील ५० वर्षीय पुरूष अशा चौघांचा आणि शारदा हॉस्पिटल कराड येथे सैदापुर (ता.कराड) येथील ६० वर्षीय महिला व कालवडे (ता.कराड) येथील ६५ वर्षीय महिला असे एकुण सहा बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com