रोहित पवारांच्या गाडीत बसून देशमुखांनी आखली आमदारकीची व्यूव्हरचना...!

माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाडीचे स्टेअरिंग आता माझ्या हातात असून देशमुख यांना मनातील नव्हे तर प्रत्यक्ष आमदार बनविण्याचा चंग बांधला असल्याची चुणूक या घटनेने दिली असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
Sitting in Rohit Pawar's car, Deshmukh made the view of MLA ...!
Sitting in Rohit Pawar's car, Deshmukh made the view of MLA ...!

गोंदवले : राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांना मनातील नव्हे तर प्रत्यक्षात आमदार करण्यासाठी आता युवा नेते आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा माण मतदारसंघात रंगू लागल्या आहेत. माणच्या दौर्‍यात श्री. देशमुखांना आपल्या गाडीत सोबत घेऊन स्वतः गाडी चालवत केलेल्या प्रवासात काय व्यूव्हरचना आखण्यात आल्या याबाबत राजकिय पटलावर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. Sitting in Rohit Pawar's car, Deshmukh made the view of MLA ...!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीच नव्हे तर संपूर्ण पवार कुटुंबियांशी घरोब्याचे संबंध असणारे नेते म्हणून प्रभाकर देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देशमुख यांनी काम केले होते. सुरुवातीपासूनच देशमुख यांनी पवारांचा विश्वास संपादन केल्याने त्यांच्यातील नाते अधिक घट्ट होत गेले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही त्यांची कायमच जवळीक राहिली. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर देशमुखांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच  राजकारणात प्रवेश केला. विधानसभेसाठी आमचं ठरलंय टीम एकत्र करून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली; परंतु यशाने त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली. मात्र, त्यानंतर माणमध्ये राष्ट्रवादी अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे पाणी पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माणमध्ये आले होते. देशमुख यांच्या लोधवड्यातील निवासस्थानाहून कार्यक्रमस्थळी जाताना पवार यांनी देशमुखांना आपल्या गाडीत घेतले. शिवाय स्वतः गाडीचे सारस्थ्यही केले. विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला असला तरी देशमुख हे माणच्या जनतेच्या मनातील आमदार असल्याचे सूचक विधानही त्यांनी या कार्यक्रमात केले. 

त्यामुळे माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाडीचे स्टेअरिंग आता माझ्या हातात असून देशमुख यांना मनातील नव्हे तर प्रत्यक्ष आमदार बनविण्याचा चंग बांधला असल्याची चुणूक या घटनेने दिली असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. या दरम्यान दोघांत काय चर्चा झाली व आगामी राजकारणाबाबत कोणत्या व्यूव्हरचना आखण्यात आल्या याची गुपिते उलघडण्याबाबत राजकारण्यामधून तर्क-वितर्क लढविले जात आहेत. मात्र माणच्या माळावर रोहित पवारांनी उडविलेला धुरळा राष्ट्रवादीत काय चमत्कार घडविणार हे येणार काळच ठरवेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com