सामान्य स्त्रीयांसाठीही कणव दाखवा; चाकणच्या ताईंना भाजपचा टोला

सर्वपक्षीय महिला नेत्यांनी एकत्र येऊन राज्यातील महिला हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी सरकारकडे जाण्याची गरज असल्याचेही शितलदेसाई यांनी म्हटले आहे.
Show compassion for ordinary women too; BJP's Critisize on Rupali Chakankar
Show compassion for ordinary women too; BJP's Critisize on Rupali Chakankar

मुंबई : चाकणच्या किल्ल्यात राहणाऱ्या ताईंनी फक्त बड्या व्यक्तींवर झालेल्या अन्यायालाच वाचा फोडू नये तर त्याबरोबरच सामान्य स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराचीही गंभीर दखल घ्यावी, यात`पक्ष`पात करू नये, असा टोला भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या मुंबई अध्यक्ष श्रीमती शीतल गंभीर देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना नाव न घेता लगावला आहे. Show compassion for ordinary women too; BJP's Critisize on Rupali Chakankar

छोट्या घरातील किंवा मोठ्या घरातील अशा कोणत्याही स्त्रीवर झालेला अत्याचार कोणीही सहन करता कामा नये. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही महिलांवर अत्याचार करू नये. या अत्याचारांचा निषेध करण्यात भेदभाव आणि `पक्ष`पात करणाऱ्या महिलांचे कृत्य लाजिरवाणे आहे. अशा अत्याचारांविरोधात सर्वच पक्षांमधील मोठमोठ्या महिला नेत्यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जावे, असेही आवाहन श्रीमती देसाई यांनी केले आहे. 

हेही वाचा : शिवसेनेच्या महापौरांनी घेतला हातात झाडू  ; भाजपला प्रत्युत्तर

नुकत्याच विदर्भातील एका भाजप लोकप्रतिनिधीच्या सुनेवर अन्याय झाल्याची कैफियत श्रीमती चाकणकर यांनी मांडली होती. नंतर त्या लोकप्रतिनिधीने सुनेचे मुलाशी विधिवत लग्नही लावून दिले होते. तर नुकताच नगरमधील महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोपही चाकणकर यांनी ट्वीट मार्फत केला आहे. ही अशा प्रकारची राजकीय हिंसा निषेधार्ह आहे, भाजप महिला मोर्चा त्याचे जराही समर्थन करणार नाही. मात्र स्वपक्षीय कार्यकर्त्यांचा निषेध करण्याचे असेच धाडसही चाकणच्या किल्लेदार ताईंनी दाखवावे, असेही श्रीमती देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे. 

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून मोठ्या संख्येने महिलांवर अत्याचार सुरु झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते सतत करीत आहेत. काल मुंबईतही एका तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यात तिचा आज मृत्यू झाला, या तरुणीला श्रद्धांजली वाहतानाच असे अत्याचार सहन न करण्याचा निर्धार सर्वपक्षीयांनी केला पाहिजे, असेही श्रीमती देसाई यांनी म्हटले आहे.  

काही महिन्यांपूर्वी झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर विजयी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथे भाजपविरोधात मोठा हिंसाचार केला होता. यात अनेक स्त्रीयांवर बलात्कार, हत्या, हिंसाचारही झाला. या हिंसाचाराचा कोणीही निषेध केल्याचे आढळले नाही. अशा प्रकारे निवडक घटनांमध्येच महिलांवरील हिंसाचाराचा निषेध करणाऱ्या पक्षपाती महिलांमुळेच राज्यात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय महिला नेत्यांनी एकत्र येऊन राज्यातील महिला हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी सरकारकडे जाण्याची गरज असल्याचेही देसाई यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com