धक्कादायक : बालसुधारगृहात अल्पवयीन संशयिताची आत्महत्या 

संबंधित युवकाच्या नातेवाईकांनी बालसुधारगृहाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली असून, तिथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धक्कादायक : बालसुधारगृहात अल्पवयीन संशयिताची आत्महत्या 
Shocking: Suicide of a minor suspect in a juvenile detention center

सातारा : वडूज पोलिसांनी अत्याचाराच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन संशयिताने साताऱ्यातील सदरबझार परिसरातील  बालसुधारगृहात आज सकाळी आत्महत्या केली. हे समजताच मृताच्या नातेवाइकांनी बालसुधारगृहाबाहेर गर्दी केल्याने तिथे पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. Shocking: Suicide of a minor suspect in a juvenile detention center

याबाबतची माहिती अशी की, खटाव तालुक्यातील एका गावात राहणार्‍या अल्पवयीन तरूणावर एका युवतीने अत्याचार केल्याचा गुन्हा वडूज पोलिस ठाण्यात नोंदविला होता. त्यानुसार पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. संशयित अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्याला निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्या अल्पवयीन संशयितांची रवानगी सातारा येथील बालसुधारगृहात करण्यात आली होती. 

हेही वाचा : मोठी बातमी : काबूल हल्ल्याचा सूत्रधार ठार! अमेरिकेचे प्रत्युत्तर
 
तेथील कक्षात तो गेले काही दिवस राहात होता. त्याने बालसुधारगृहातच आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी समोर आले. याची माहितीनंतर निरीक्षण गृह व्यवस्थापनाने सातारा शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करत सदर घटनेची माहिती पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना दिली. 

यानंतर वडूज पोलिस ठाण्याच्या मार्फतीने या घटनेची माहिती मृत युवकाच्या नातेवाईकांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच संबंधित युवकाच्या नातेवाईकांनी बालसुधारगृहाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली असून, तिथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. युवकाविरोधात अत्याचाराची तक्रार नोंदविलेल्या युवतीस तसेच तिच्या कुटुंबियांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in