शिवसेनेकडून स्मारकाचे अशुद्धिकरणच; असे वर्तन शिवसेनेला न शोभणारे....

आमचं फडणवीस सरकार सत्ते असते तर आम्ही न्यायालयात चांगली बाजू मांडली असती. या सरकारला बाजू मांडता आली नाही. परवानगी न घेता मोर्चा, आंदोलन केले असेल तर पोलिस कारवाई करतील.
शिवसेनेकडून स्मारकाचे अशुद्धिकरणच; असे वर्तन शिवसेनेला न शोभणारे....
Shivsena's desecration of the memorial; Such behavior does not suit Shivsena ....

नाशिक : नारायण राणे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले डॅशिंग नेते आहेत. बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे शुद्धिकरण नव्हे तर अशुद्धिकरण केलं असून असे वर्तन शिवसेनेला शोभणारे नाही, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. Shivsena's desecration of the memorial; Such behavior does not suit Shivsena ....

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याशी आज पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी नाशिक विमानतळाबाबत बोलताना मंत्री आठवले म्हणाले, नाशिकमधील विमान तळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात मी दिल्लीतील मंत्र्याना भेटणार असून नाशिककरांची याबाबत ही अग्रही मागणी आहे. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त होत असून याबाबत नेमके काय, असे विचारले असता मंत्री आठवले म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. फक्त सरकारला याचा सामना करता येणार नाही. कोरोना काळात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामधील काही पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. त्यांना ही 50 लाखाच्या विमा मिळावा, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे मागणी करणार असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे आठवेल यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ते म्हणाले, काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा निर्णय झालेला नाही. बाकीच्या राज्यात ही 50 टक्केपेक्षा जास्त आरक्षण आहे. त्यामुळे आपल्या राज्याने ही यासंदर्भात निर्णय घ्यावा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. जातीय व्यवस्था आहे तसेच आरक्षण ही असलं पाहिजे. मोदी सरकारचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. संपूर्ण देशात क्षत्रियांना 10 ते 12 टक्के आरक्षण द्यावे, ही मागणी पंतप्रधान यांच्याकडे केली आहे. त्यासाठी मी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलताना आठवले म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तारात चार समाजाच्या मंत्र्यांना संधी मिळाली आहे. त्याचा राज्याला फायदा होईल. महाराष्ट्रात लवकरात लवकर आपले सरकार आणायचं आहे. यासाठी प्रयत्न सुरू असून मुंबई, नाशिकसह 10 मनपा भाजप आणि आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास व्यक्त करून त्यासाठी रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मराठा आंदोलनासाठी नांदेडला अशोक चव्हाण गेले नसतील. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. म्हणून काय त्यांचा आरक्षणाला विरोध आहे, असं होतं नाही. मराठा समाजात गरीब लोक आहेत. ज्यांचं उत्पन्न कमी आहे. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. आमचं फडणवीस सरकार सत्ते असते तर आम्ही न्यायालयात चांगली बाजू मांडली असती. या सरकारला बाजू मांडता आली नाही. परवानगी न घेता मोर्चा, आंदोलन केले असेल तर पोलिस कारवाई करतील.

सोनिया गांधींनी विरोधीपक्षातील नेत्यांची बैठक बोलावली आहे, याविषयी बोलताना मंत्री आठवले म्हणाले, मुळात त्यांच्या बैठकीला किती लोक जातील, माहित नाही. सर्व विरोधी पक्ष एकत्र येणे अवघड आहे. एकत्र आले तर मोदींना फायदा होईल. मोदी खमके नेते आहेत. पुढील निवडणूका आम्ही जिंकणार असल्याचा विश्वास ही त्यांनी बोलून दाखविला. ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये भाजपचे मत वाढले, तिथे काँग्रेसला मत मिळाले नाही. 

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेविषयी बोलताना मंत्री आठवले म्हणाले, लोकांचा आशीर्वाद मागण्याचा लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. तुम्ही आंदोलन केली तेव्हा कोरोना दिसला नाही. पण कोरोनाचा तिसरा टप्पा येईल असं वाटत नाही.नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले, त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या जागेचे शुद्धीकरण केले. याविषयी विचारले असता मंत्री आठवले म्हणाले, नारायण राणे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले डॅशिंग नेते आहेत. बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेले शुद्धिकरण नसुन ते अशुद्धिकरण आहे. असे वर्तन शिवसेनेला शोभणारे नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in