शिवसेनेने तीन पिढ्या बरबाद केल्या : राजन देसाई - Shivsena ruined three generations says Rajan Desai | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेने तीन पिढ्या बरबाद केल्या : राजन देसाई

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

कोकणात विकास फक्त राणे यांच्यामुळेच झाला. राणे कोकणचे खरे नेते असल्याने पक्षभेद विसरून कार्यक्रमाला आलो आहे. सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगण्याची धमक नीलेश राणे यांच्याकडे आहे. कोकणातील अन्यायावर कोणीही लोकप्रतिनिधी बोलत नाहीत, हे दुर्दैव आहे. कोकणचे लोक पर्याय शोधत आहेत.

रत्नागिरी : शिवसेनेचे दाखवायचे दात वेगळे आहेत. सेनेने कोकणातील तीन पिढ्या बाद केल्या. शिवसेनेने कोकणात आलेल्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला, त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर शिवसेनेचा झेंडा कोण खांद्यावर घेणार? त्यामुळेच सेना प्रकल्पाला विरोध करते. त्यामुळेच तरुण बेरोजगार आहेत. परंतु चालू प्रकल्पातून हेच नेते झोळी भरतात, अशी टीका राजन देसाई यांनी केली.

भाजप प्रदेश चिटणीस नीलेश राणे यांच्या सत्कार सोहळ्यात राजन देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. कोकणात विकास फक्त राणे यांच्यामुळेच झाला. राणे कोकणचे खरे नेते असल्याने पक्षभेद विसरून कार्यक्रमाला आलो आहे. सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगण्याची धमक नीलेश राणे यांच्याकडे आहे. कोकणातील अन्यायावर कोणीही लोकप्रतिनिधी बोलत नाहीत, हे दुर्दैव आहे. कोकणचे लोक पर्याय शोधत आहेत.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने म्हणाले की, 2021 हे वर्ष आशादायी आहे आणि भाजपच्यादृष्टीने चांगली सुरवात झाली आहे. ऍड. दीपक पटवर्धन व नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत 300 सदस्य निवडून आले. खासदार नारायण राणे यांचे अस्तित्व दीपस्तंभाप्रमाणे आहे. पार्लमेंट ते पंचायत हे भाजपचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. कोकणात भाजप नंबर एकचा पक्ष करायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मनपरिवर्तन केले पाहिजे.

आयुर्वेदिक-ऍलोपॅथीने मिळेल यश
ऍड. पटवर्धन म्हणजे आयुर्वेदिक डॉक्‍टर व त्याला नीलेश राणेंच्या ऍलोपॅथीची जोड मिळाली की, खऱ्या अर्थाने भाजपच्या विजयाचे कॉम्बिनेशन जुळून येईल. पेला अर्धा रिकामा नव्हे तर भरलेला आहे, असे म्हटले पाहिजे. एखाद्या कार्यक्रमात मी दिसलो नाही की, अनेकजण उगाचच चिंता व्यक्त करतात. परंतु आम्ही 100 टक्के विजयासाठी एकत्र असून त्यात कोणी मिठाचा खडा टाकू नये, असे बाळ माने यांनी स्पष्टपणे सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख