शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माण तालुक्यात मारहाण; तक्रार घेण्यास म्हसवड पोलिसांची टाळाटाळ

पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. उलटे तक्रारदारांनाच दमदाटी करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. हा सर्व घडलेला प्रकार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व वरिष्ठांना कळविल्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी माण खटावचे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते.
Shivsena office bearers beaten in Maan taluka; Mhaswad police refrained from lodging a complaint
Shivsena office bearers beaten in Maan taluka; Mhaswad police refrained from lodging a complaint

म्हसवड : काळचौंडी (ता. माण) येथील ग्रामपंचायतीच्या मतदानादिवशी (ता. 25) येथील सहा जणांनी शिवसेनेचे माण तालुकाप्रमुख व उप तालुका प्रमुखावर तलवार व काठ्या हातात घेऊन हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यानंतर तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याने माण- खटावच्या शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दुपारी तासभर म्हसवड पोलिस ठाण्यासमोर भर उन्हात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे तब्बल 24 तासानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. 

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, काळचौंडी गावच्या हद्दीत काळचौंडी चौक ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात सुमारे दोनशे मीटर अंतरावर तालुका प्रमुख बाळासाहेब महंमद मुलाणी (रा.हिंगणी, ता.माण) व उपतालुका प्रमुख शिवदास महादेव केवटे ( रा.म्हसवड) हे मतदानाची स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेत होते.

त्यावेळी त्या ठिकाणी तलवारी व काठ्या हातात घेऊन विशाल बाळासो माने, विलास काशिनाथ माने, सचिन काशिनाथ माने, स्वप्निल सचिन माने, ऋषिकेश बाळासो माने, विष्णू आबाजी माने ( सर्वजण रा.काळचौंडी ता.माण) हे सहा जण आले. त्यांनी ''तु इथे कशाला आलास, याला कापून टाकूया'' असे म्हणून माझेवर व शिवदास केवटे (रा म्हसवड) यांचेवर हल्ला केला. तसेच त्यांच्या खिशातील पाच हजार तीनशे रुपये कोणीतरी काढून घेतले. 

ही घटना घडली, त्या दिवशी संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पदाधिकारी थांबले होते. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. उलटे तक्रारदारांनाच दमदाटी करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. हा सर्व घडलेला प्रकार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व वरिष्ठांना कळविल्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी माण खटावचे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते.

त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी म्हसवड पोलिस ठाण्यासमोर भर उन्हात ठिय्या मांडला. यावेळी जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, संघटक रामभाऊ जगदाळे, खटाव तालुकाप्रमुख युवराज पाटील यांनी भेट दिली.

यावेळी शहरप्रमुख राहूल मंगरुळे, सुशांत पार्लेकर, उपतालुकाप्रमुख आंबादास शिंदे, बाळासाहेब जाधव, युवासेना तालुकाध्यक्ष क्रुष्णराज आवळे-पाटील, अंबादास नरळे, अमित कुलकर्णी, सोमनाथ कवी, किशोर गोडसे, समीर जाधव, ए.के.नामदास, उपशहरप्रमुख आनंद बाबर, शाखाप्रमुख सतिश विरकर, प्रितम तिवाटणे, सिध्दनाथ कवी, सोनु मदने आदी उपस्थित होते.

सत्तेत असूनही शिवसेना पदाधिकाऱ्यांवर ही वेळ येत असेल तर इतर सर्वसामान्यांचे काय, तक्रार घेण्याऐवजी तक्रारदारालाच दमदाटी करणाऱ्या मगरुर पोलिस अधिका-यांची तातडीने बदली करावी. अन्यथा, शिवसेना पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल. 

- चंद्रकांत जाधव (शिवसेना जिल्हा प्रमुख, माण-खटाव)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com