कऱ्हाड : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासंदर्भात २२ तारखेला ठराव सादर झालेले आहेत. शिवसेनची जिल्हा बॅंकेसंदर्भातील भुमिका ठरवण्यासाठी लवकरच बैठक होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
सातारा जिल्हा बँकेची रणधुमाळी सध्या सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील निवडणुकीत शंभुराज देसाई यांना जिल्हा बॅंकेत संधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले गेले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यापार्श्वभुमीवर मंत्री देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
त्यासंदर्भात ठरावही सादर झालेले आहेत. शिवसेनची जिल्हा बॅंकेसंदर्भातील भूमिका ठरविण्यासाठी पक्षाची बैठक होणार होती. मात्र, आमदार महेश शिंदे आजारी असल्याने बैठक झाली नाही. मात्र अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात आमदार, माजी आमदार, पदाधिकारी यांची बैठक होईल. त्यामध्ये भुमिका ठरवली जाईल.
राठोडांची पाठराखण
मंत्री संजय राठोड हे संबंधित ठिकाणी असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. याविषयी विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, संजय राठोड यांनी गर्दी जमवली असे नाही. तर ते दर्शनासाठी ते गेले होते. त्यामुळे तेथे गर्दी झाली. त्याअनुशंघाने चौकशी केल्यावर कोरोनाचे उल्लंघन झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाला आदेश दिले होते. त्याप्रमाणे तेथे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या प्रकरणामुळे कोणीही नाराज नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.