राणेंच्या ॲक्शनला शिवसैनिकांची रिॲक्शन होणारच....

आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे वक्तव्य सहन करणार नाही. राज्यभरातील तसेच देशभरातील शिवसैनिकांच्या रोषाला राणेंना सामोरे जावे लागणार आहे.
राणेंच्या ॲक्शनला शिवसैनिकांची रिॲक्शन होणारच....
Shivsainiks will react to Rane's action ....

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी अपमानास्पद वक्तवय शिवसैनिक सहन करणार नाहीत. नारायण राणेंनी आपले वक्तव्य मागे घ्यावे. अन्यथा
ॲक्शनला रिॲक्शन येणारच. आता जे प्रचलित राज्यातील नियम आहेत, त्यावर नारायण राणे यांच्यावर कारवाई होणारच अशा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपर्य वक्तव्याचा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी निषेध करत त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, राणेंचे वक्तव्य अतिशय बेजबादार आणि केंद्रीय मंत्री पदाला न शोभणार आहे. मंत्रिपद मिळाल्याने आभाळ दोन बोट ठेंगण  झाल्यासारखं त्यांचं वागणं झालं आहे.

आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे वक्तव्य सहन करणार नाही. राज्यभरातील तसेच देशभरातील शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. नारायण राणे यांनी आपलं वक्तव्य माग घ्यावं. अन्यथा, ॲक्शनला रिऍक्शन येणारच..आता जे प्रचलित राज्यातले नियम आहेत. त्यानुसार नारायण राणे यांच्यावर कारवाई होणारच असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in