उदयनराजेंच्या भूमिकेला शिवेंदसिंहराजेंचा पाठींबा; टोलमाफीसाठी आंदोलनात उतरणार

टोलनाके हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार हे जिल्हा प्रशासनाला अजिबात जुमानत नाहीत. रस्त्यांची दुरुस्ती, टोलमध्ये सवलत आदी प्रश्‍नांबाबत जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या कोणत्याही बैठकीला हे अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित रहात नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन हे प्रश्‍न सोडवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
Shivendraraje's support for Udayanraje's role; Will agitate for toll exemption
Shivendraraje's support for Udayanraje's role; Will agitate for toll exemption

सातारा : खासदार सुप्रिया सुळे यांनी खेड- शिवापूर टोलनाक्याबाबत आंदोलनाची भूमिका घेऊन एम. एच. १२ आणि एम.एच. १४ या वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला. त्याच पध्दतीने खासदार उदयनराजे भोसले व खासदार श्रीनिवास पाटील यांनी आनेवाडी, तासवडे टोलनाक्यांवर  एम. एच.११ आणि एम.एच. ५० या वाहनांना टोलमाफी मिळावी म्हणून निर्णय घ्यावा. वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले तर मी शंभर टक्के खासदारांच्या सोबत असेन, असे स्पष्ट मत साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

खासदार उदयनराजे यांनी टोलबाबत नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. या भूमिकेचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्वागत केले आहे. यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले की, सेवा रस्ते आणि महामार्गाची दुरवस्था, स्थानिकांसाठी टोल सवलत आदी प्रश्‍नांसाठी वारंवार आंदोलने झाली आहेत.

टोलनाके हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार हे जिल्हा प्रशासनाला अजिबात जुमानत नाहीत. रस्त्यांची दुरुस्ती, टोलमध्ये सवलत आदी प्रश्‍नांबाबत जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या कोणत्याही बैठकीला हे अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित रहात नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन हे प्रश्‍न सोडवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

खेड- शिवापूर येथील टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमध्ये सवलत मिळावी म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन स्वत:च्या पातळीवर हा प्रश्‍न सोडवला. त्यामुळे एम.एच. १२ आणि एम.एच. १४ पासिंग असलेल्या स्थानिकांच्या वाहनांना टोलमाफी मिळाली. सद्य परिस्थिती पाहिल्यास टोलनाके हे भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचे चित्र आहे. टोलनाक्यावर बोगस पावत्याद्वारे चालू असलेला भ्रष्टाचार नुकताच उघड झाला आहे.

टोलनाक्यांवरील भ्रष्टाचार बंद होणे आणि स्थानिकांच्या वाहनांना टोलमाफी मिळणे अत्यावश्यक आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच  सातार्‍यातील दोन्ही खासदारांनी आनेवाडी आणि तासवडे या दोन टोलनाक्यांवर एम.एच. ११ आणि एम.एच. ५० पासिंग असलेल्या स्थानिकांच्या वाहनांना टोलमाफी मिळण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी. वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले तर स्थानिक आमदार म्हणून मी शंभर टक्के खासदारांच्या सोबत राहून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य देईन, असे त्यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com