शिवेंद्रसिंहराजे उभारणार मेढ्यात ऑक्सिजन प्लँट; आमदार फंडातून दिला निधी  

ऑक्सिजन प्लँट उभा राहिल्यानंतर जम्बो कोविड सेंटर, जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्रांसह हॉस्पिटलस्‌ना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. पर्यायाने कोरोना बाधित रुग्णांना अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे.
Shivendraraje to set up an oxygen plant at Medha; Funds given from MLA fund
Shivendraraje to set up an oxygen plant at Medha; Funds given from MLA fund

सातारा : कोरोनात वाढलेली रूग्ण संख्या व अपुरी यंत्रणा यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभा राहणार आहे. यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतःच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच या  प्लाँटच्या उभारणीस प्रारंभ होणार आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही थैमान घातले आहे. दररोज दीड ते दोन हजारच्या पटीने रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत, बेड मिळाला तर ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी पुढाकार घेतला आहे.

मेढा येथे ऑक्सिजन निर्मिती प्लँट सुरु करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी लेखी पत्रव्यवहार करून चर्चा केली. या प्लँटसाठी निधीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यासाठी लागणारा संपूर्ण निधी त्यांनी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे हा प्लँट उभा राहण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. प्लँट निर्मितीसाठी मेढा ग्रामीण रुग्णालयाची जागा निश्चित करण्यात आली असून या जागेची पाहणी आज (सोमवारी) आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. आर. मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्ष कल्पना जवळ, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी अमोल पवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते.

ऑक्सिजन प्लँट उभा राहिल्यानंतर जम्बो कोविड सेंटर, जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्रांसह हॉस्पिटलस्‌ना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. पर्यायाने कोरोना बाधित रुग्णांना अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com