रामराजेंची विश्रामगृहात खलबते; शिवेंद्रसिंहराजेंनी शिवरूपराजेंसोबत घेतली भेट - Shivendraraje and Shivaruparaje Khardekar met Ramraje today in Circuit House | Politics Marathi News - Sarkarnama

रामराजेंची विश्रामगृहात खलबते; शिवेंद्रसिंहराजेंनी शिवरूपराजेंसोबत घेतली भेट

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

शिवेंद्रसिंहराजेंनी रामराजेंशी अल्पवेळ चर्चा केली. त्यानंतर ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. या दोन्ही नेत्यांत जिल्हा बॅंकेच्या कृषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघाबाबत चर्चा झाली असून या मतदारसंघातून पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे ही इच्छुक आहेत. तसेच शिवरूपराजेंसाठी हा मतदारसंघ शिवेंद्रसिंहराजेंना हवा आहे.

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीसाठी राजकिय हालचाली गतीमान झाल्या असून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आज साताऱ्यातील शासकिय विश्रामगृहात खलबते झाली. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासमवेत रामराजेंची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर रामराजेंनी माण-खटावमधील भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही चर्चा केली. 

जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने दररोज नवीन नवीन घडामोडी घडू लागल्या आहेत. आजपर्यंत बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले केंद्रस्थानी होते. आता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भोवती राजकिय वातावरण फिरू लागले आहे.

आज सभापती रामराजे सातारा शासकिय विश्रामगृहात थांबलेले असताना एका लग्नातील सुपारीचा कार्यक्रम उरकून भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले शासकिय विश्रामगृहात आले. त्यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा बॅंकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर उपस्थित होते. तर विश्रामगृहात रामराजेंसोबत माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, बाळासाहेब महामुलकर उपस्थित होते.

यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी रामराजेंशी अल्पवेळ चर्चा केली. त्यानंतर ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. या दोन्ही नेत्यांत जिल्हा बॅंकेच्या कृषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघाबाबत चर्चा झाली असून या मतदारसंघातून पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे ही इच्छुक आहेत. तसेच शिवरूपराजेंसाठी हा मतदारसंघ शिवेंद्रसिंहराजेंना हवा आहे. त्यामुळे या मतदारसंघावर शिवेंद्रसिंहराजे व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा डोळा आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. तर शिवेंद्रसिंहराजेंकडे या मतदारसंघातील मते जास्त आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला मिळणार याचीच उत्सुकता आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख