एकमेकांना आव्हान देणारे शिवेंद्रसिंहराजे, शशीकांत शिंदे लग्न समारंभात आले एकत्र

दिल्लीत दोन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले व श्रीनिवास पाटील यांची भेट झाली. दोघांनीही आपला पक्ष, वैरत्व विसरून जिल्ह्याचे प्रश्न एकत्रितपणे संसदेत मांडण्याचा निश्चय केला. तर दुसरीकडे सातारा-जावळी मतदारसंघावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशिकांत शिंदे यांच्यात एकमेकांना आव्हान देण्यापर्यंत मजल गेली होती.
Shivendraraje and Shashikant Shinde, who were challenging each other, came together at the wedding ceremony
Shivendraraje and Shashikant Shinde, who were challenging each other, came together at the wedding ceremony

सातारा : दोन दिवसांपूर्वी सातारा-जावळी मतदारसंघावरून एकमेकांना आव्हान देणारे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे आज एका लग्न समारंभात एकामेकांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. दोघांत अल्पवेळ चर्चा सुध्दा रंगली. हे चित्र पाहून उपस्थितांच्या मात्र, भुवया उंचावल्या होत्या.

त्यानंतर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासोबत दोघांनी फोटोही काढले. दोघांना एकत्र पाहून पत्रकारांनी त्यांना विचारले असता आम्ही एकत्र येऊ नये का, असा उलट प्रश्न शशीकांत शिदेंनी केला. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे आजच्या घटनेने सिध्द केले.   

दिल्लीत दोन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले व श्रीनिवास पाटील यांची भेट झाली. दोघांनीही आपला पक्ष, वैरत्व विसरून जिल्ह्याचे प्रश्न एकत्रितपणे संसदेत मांडण्याचा निश्चय केला. तर दुसरीकडे सातारा-जावळी मतदारसंघावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशिकांत शिंदे यांच्यात एकमेकांना आव्हान देण्यापर्यंत मजल गेली होती.

त्यानंतर या दोघांच्या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानंतर आज माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी उडी घेऊन दोघाही आमदारांवर टीकेची झोड उठविली. पण हे वैरत्व विसरून हे दोन्ही आमदार आज एका लग्न समारंभात एकत्र आले व मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळाले.
 
दोघांना एकत्र शेजारी शेजारी बसल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सोबत दोघांनी फोटो सेशन केले. यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांना आपण एकत्र कसे आलात याबाबत विचारले असता, आम्ही एकत्र येऊ नये का, असा उलट प्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. या निमित्ताने राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे सिद्ध झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com