गृहराज्यमंत्र्यांच्या घरासमोर पेटविल्या शेणी; राष्ट्रवादी, काँग्रेस भवनावर अज्ञातांची दगडफेक

मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अज्ञातांने हा प्रकार केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, या प्रकारानंतर गृहराज्यमंत्र्यांच्या घरासमोर घडलेल्या प्रकाराची अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी पहाणी केली. तसेच अधिक तपासासाठी पोलिसांना सूचना केल्या आहेत.
गृहराज्यमंत्र्यांच्या घरासमोर पेटविल्या शेणी; राष्ट्रवादी, काँग्रेस भवनावर अज्ञातांची दगडफेक
Sheni lit in front of the Home Minister's house; Unknown stone pelting on NCP, Congress building

सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या कोयना दौलत या निवासस्थानासमोर आज अज्ञाताने शेणी पेटवून दिल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (National Congress Party) व काँग्रेस (Congress) भवनावर दगडफेक करून अज्ञातांनी भवनांच्या आवारात शेणी टाकल्या. या घटनेमुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्दच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अज्ञातांनी हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा प्रकार करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. (Sheni lit in front of the Home Minister's house; Unknown stone pelting on NCP, Congress building)

सातारा शहरातील पोवई नाका परिसरातील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत या घरासमोर आज सकाळी कोणीतरी शेणी आणून ठेऊन त्या पेटविल्याचे निदर्शनास आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच हा प्रकार घडल्याने सातारा शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने या पेटलेल्या शेणी विझविल्या व त्या ताब्यात घेतल्या.

या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर ही अज्ञात व्यक्तींनी सकाळी दगडफेक केली. काचांचा आवाज आल्यामुळे भवनातील कार्यकर्ते बाहेर आले. त्यामुळे गेटवरून उडी मारून संबंधित पळून गेल्याचे निदर्शनास आल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तसेच काँग्रेस भवनावरही दगडफेक झाली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. तसेच अज्ञातांचा शोध घेण्यासाठी सुत्रे हालविली आहेत.

मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अज्ञातांने हा प्रकार केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर गृहराज्यमंत्र्यांच्या घरासमोर घडलेल्या प्रकाराची अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी पहाणी केली. तसेच अधिक तपासासाठी पोलिसांना सूचना केल्या आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in