शिवेंद्रसिंहराजेंना नेतृत्वासाठी शशीकांत शिंदेंची खुली ऑफर....

महामार्ग व टोलमाफीसाठी आंदोलन झाले तर स्वतः पुढाकार घेऊ आंदोलनात उतरण्याची आमची तयारी आहे. या प्रश्नी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्यासोबत मी आंदोलनात उतरण्यास तयार आहे.
शिवेंद्रसिंहराजेंना नेतृत्वासाठी शशीकांत शिंदेंची खुली ऑफर....
Shashikant Shinde's open offer to Shivendraraje for leadership ....

सातारा : जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाबाबत प्रचंड त्रुटी आहेत. मुळात साताऱ्याला टोल लागू नये, ही सर्वांची मागणी आहे. या मागणीसाठी सर्वपक्षिय आंदोलन झाल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चित सहभागी होईल. सर्व सातारकरांच्या एकजूटीचा जनरेटा निर्माण करणाऱ्या आंदोलनाची सध्या गरज आहे. यासाठी शिवेंद्रसिंहराजेंसह इतर कोणीही पुढाकार घ्यावा, आम्ही त्या आंदोलनात उतरण्यास तयार आहोत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद आमदार शशीकांत शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. Shashikant Shinde's open offer to Shivendraraje for leadership ....

राष्ट्रवादी भवनात झालेल्या जनता दरबारानंतर आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणूकीच्या रणनितीविषयीविचारले असता ते म्हणाले, जिल्हा बँक ही राजकारण विरहित असावी, या मानसिकतेतून बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सध्या याद्यांचा कार्यक्रम सुरू असून त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील.  

महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आहेत. कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने तुमची अडचण होते का, या प्रश्नावर ते म्हणाले, महाविकास आघाडीत सगळे एकत्र असल्याने थोडी अडचण होते. पण सगळे संभाळून घेऊन वाटचाल करत आहोत. सध्या माझ्याकडील जबाबदाऱ्यांचा व्याप वाढल्याने सगळीकडे थोडे थोडे लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे कोरेगावकडे दूर्लक्ष होतेय असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गासह रस्त्यांचीही दूरवस्था झालेली आहे, याकडे आमदार शिंदेंचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, महामार्गाच्या कामात प्रचंड त्रूटी राहिलेल्या आहेत. त्यामुळे साताऱ्याला टोल लागू नये अशी सर्वांची मागणी आहे. यासाठी सर्व पक्षिय आंदोलन झाले तर त्यामध्ये आम्ही शंभर टक्के सहभागी  होऊ. महामार्ग व टोलच्या प्रश्नाबाबत सातारकरांसाठी सर्वपक्षिय आंदोलन गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांची एकजूट करून आंदोलन केले तर जनरेटा तयार होईल.

पुणे सातारा रस्त्याचे काम एका कंपनीने केलेले आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत. त्यामुळे आजही लोकांना महामार्गावर जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे महामार्ग व टोलमाफीसाठी आंदोलन झाले तर स्वतः पुढाकार घेऊ आंदोलनात उतरण्याची आमची तयारी आहे. या प्रश्नी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्यासोबत मी आंदोलनात उतरण्यास तयार आहे. 

तामिळनाडू, कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी, अशी या बैलगाडा मालकांची मागणी आहे. बैलांवरील प्रेमापोटी मालक स्पर्धा व शर्यतीसाठी बैलांची जपणूक करतात. आज आम्ही शिष्टमंडळाच्या माध्यमातून पोलिस अधीक्षकांना भेटूनबैलगाडा मालकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी करणार आहोत. तसेच येत्या दोन दिवसात खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहोत. तसेच पशुसंवर्धन मंत्र्यांसोबत बैठक घेण्याची विनंती करणार असून खेळ व स्पर्धेची नियमावली व निकषाच्या आधारे बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनास आमचा पाठींबा राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in