शरद पवार, मंत्री टोपे घेणार कोल्हापूर, साताऱ्यातील कोरोनाचा आढावा

कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही सातारा जिल्ह्यात वाढले आहे. यावर जिल्हा प्रशासन नेमके कुठे कमी पडत आहे. याची माहिती मंत्री टोपे घेणार आहेत. कोल्हापूर व सातारा जिल्ह्याचा आढावा कऱ्हाडात होत असल्याने कोल्हापूरातील प्रमुख मंत्री व नेते मंडळी कऱ्हाडात येणार आहेत.
NCP President Sharad Pawar and Minister Rajesh Tope
NCP President Sharad Pawar and Minister Rajesh Tope

सातारा : कोरोनाचा वाढता संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाय योजना करण्यासाठी कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील आढावा घेण्यासाठी उद्या (रविवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे कऱ्हाडात बैठक घेणार आहेत. दोन्ही जिल्ह्यात कोरोना रूग्णांना बेड कमी पडत असल्याने त्यावर उपाय म्हणून नवीन कोरोना हॉस्पिटल सुरू करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. 

कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्षात घेऊन संसर्ग रोखण्याच्या जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाय योजना आणि नव्याने करायच्या उपाय योजनांची आढावा बैठक उद्या (रविवारी) कऱ्हाडात होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या उपाय योजना अपुऱ्या पडत असल्याने उपचाराविना मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे.

तसेच कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही सातारा जिल्ह्यात वाढले आहे. यावर जिल्हा प्रशासन नेमके कुठे कमी पडत आहे. याची माहिती मंत्री टोपे घेणार आहेत. कोल्हापूर व सातारा जिल्ह्याचा आढावा कऱ्हाडात होत असल्याने कोल्हापूरातील प्रमुख मंत्री व नेते मंडळी कऱ्हाडात येणार आहेत.  कोल्हापूरच्या ग्रामीणसह शहरी भागातही कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. अनेक मोठी गावे कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहेत.

त्यातच रूग्णांना वेळेत बेड मिळत नसल्याने आतापर्यंत दहा ते बारा रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील मृतांची संख्या अडीचशे झाली असून पाच हजारांवर रूग्ण उपचार घेत आहेत. एकुणच सातारा व कोल्हापूरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यावर तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन कोठे कमी पडतय याचा आढावा घेऊन मंत्री राजेश टोपे यांवर काहीतरी उपाय योजना सुचवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आढावा घेत आहेत. रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी कोरोना रूग्णालय सुरू करण्याबाबतही या बैठकीत निर्णय होणार आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com