महाराष्ट्रातील य़ा अधिकाऱ्यांची आयपीएसमध्ये निवड

राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपअधीक्षक झालेले अधिकारी हे दहा ते बारा वर्षांच्या सेवेनंतर भारतीय पोलिस सेवेचे (आयपीएस) अधिकारी होतात. पोलिस अपअधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, उपायुक्त अशा पदांवर काम केल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे जिल्ह्याचा कारभार पाहण्याची संधी आयपीएस झाल्यानंतर मिळते. त्यांच्या सेवेनुसार त्यांचे आयपीएस सेवेची बॅच निर्धारित होते.
Selection of 16 police officers from the state for the Indian Police Service
Selection of 16 police officers from the state for the Indian Police Service

सातारा : राज्यातील 16 पोलिस अधिकाऱ्यांची भारतीय पोलिस सेवेसाठी निवड झाली आहे. यामध्ये 2017 च्या बॅचचे सहा तर 2018 च्या बॅचच्या दहा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपअधीक्षक झालेले अधिकारी हे दहा ते बारा वर्षांच्या सेवेनंतर भारतीय पोलिस सेवेचे (आयपीएस) अधिकारी होतात. पोलिस अपअधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, उपायुक्त अशा पदांवर काम केल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे जिल्ह्याचा कारभार पाहण्याची संधी आयपीएस झाल्यानंतर मिळते. त्यांच्या सेवेनुसार त्यांचे आयपीएस सेवेची बॅच निर्धारित होते. 

सध्या महाराष्ट्र पोलिस सेवेत कार्यरत असलेल्या १६ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भारतीय पोलिस सेवेसाठी निवड केली आहे. यामध्ये 2017 च्या बॅचचे सदानंद वायसे पाटील, अविनाश बारगळ, नंदकुमार ठाकुर, शिरीष सरदेशपांडे, नितीन प्रभाकर पवार, डॉ. दिगंबर प्रधान तसेच 2018 च्या बॅचमधील श्रीमती शीला साहिल, पांडुरंग पाटील, तुषार दोशी, बाळासाहेब वाघमोडे-पाटील, सुभाष बुरसे, सुनिता साळुंखे-ठाकरे, श्रीकांत परोपकारी, सोमनाथ घार्गे, रवींद्रसिंह परदेशी, पुरूषोत्तम कऱ्हाड यांचा समावेश आहे.

यातील सदानंद वायसे पाटील हे वेटलिफ्टींग, शरिरसौष्ठव आणि  नेमबाजीतील राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी अखिल भारतीय गोसेवा  पुरस्कार, राज्य तंटामुक्ती पुरस्कार, उत्कृष्ट तपासी अधिकारी पुरस्कार प्राप्त केलेला आहे.  त्यांनी कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यात पूर परिस्थितीत उत्कृष्ठ कामगिरी बजावली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com