माणमधून योग्य माणूस जिल्हा बँकेवर निवडून द्या; आपल्याला बँक चालवायचीय..बंद पाडायची नाही....

रामराजे म्हणाले, रिझर्व्ह बँक सहकारच्या मुळावर उठली आहे. त्यांना सहकार संस्थाच मोडीतच काढायच्या आहेत. त्यामुळेच त्यांचे जाचक नियम पतसंस्था, जिल्हा बँकावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठे कर्ज बुडवून गेलेल्या विजय मल्ल्याचे कर्ज रिझर्व्ह बँक भरतेय. मात्र, छोट्या कर्जधारकांना रिझर्व्ह बँक धारेवर धरतेय, हा कोणता न्याय.
Select the right person from Maan taluka at the DCCbank; You want to run a bank .. not close says Ramraje naik Nimbalkar
Select the right person from Maan taluka at the DCCbank; You want to run a bank .. not close says Ramraje naik Nimbalkar

बिजवडी (ता. माण) : जिल्हा बँकेची निवडणूक लवकरच लागतेय. जिल्ह्यात नेहमीप्रमाणे माण तालुक्यातच बँकेच्या निवडणूकीचा जास्त जोर दिसतोय. ठराव कोणाचे झालेत, कसे झालेत, किती झालेत यापेक्षा योग्य माणूस निवडून द्या. आपल्याला बँक चालवायचीय.. बंद पाडायची नाही, असा टोला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माण तालुक्यातील विरोधकांना लगावला आहे. 

वावरहिरे (ता. माण) येथे श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वावरहिरे शाखेच्या नूतनीकरणाच्या उदघाटनप्रसंगी रामराजे बोलत होते.
 यावेळी माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक नरेंद्र पाटील, सुभाष नरळे, संदिप मांडवे, उपनगराध्यक्ष धनाजी माने, एम.के. भोसले, बाळासाहेब सावंत, सरपंच चंद्रकांत वाघ, रमेश कदम, सिध्दनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष सुनिल पोळ, उपाध्यक्ष सुरेश इंगळे तसेच संचालक, सरव्यवस्थापक महादेव गोंजारी उपस्थित होते. 

रामराजे म्हणाले, रिझर्व्ह बँक सहकारच्या मुळावर उठली आहे. त्यांना  सहकार संस्थाच मोडीतच काढायच्या आहेत. त्यामुळेच त्यांचे जाचक नियम पतसंस्था, जिल्हा बँकावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठे कर्ज बुडवून गेलेल्या विजय मल्ल्याचे कर्ज रिझर्व्ह बँक भरतेय. मात्र, छोट्या कर्जधारकांना रिझर्व्ह बँक धारेवर धरतेय, हा कोणता न्याय.

माझं तर असं मत आहे की ही रिझर्व्ह बँकच नष्ट करून टाकली पाहिजे. येणाऱ्या काळात सहकार क्षेत्रावर मोठे संकट घोंघावत आहे त्यामुळे सहकार टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे. राष्ट्रीयकृत बँकात शेतकऱ्यांची पत नसल्याने त्यांना कर्ज प्रकरणे मिळत नव्हती. यावर कै. वाघोजीराव काकांसारख्या दूरदृष्टी नेत्यांनी सहकार क्षेत्रात लक्ष घालत पतसंस्था काढल्या. बँकेत पत नसलेल्या लोकांना पतसंस्थेच्या माध्यमातून पत मिळवून देत कर्जप्रकरणे देऊन आर्थिक सहाय्य केले. 

प्रभाकर घार्गे म्हणाले, काकांच्याकडे आम्ही अनेकांना कर्ज द्या म्हणून केलेल्या शिफारशी त्वरित मान्य झाल्या. परंतू एखाद्याला कर्जप्रकरणात वसूलीला थोडी सवलत द्या अशा शिफारशी कधीच ऐकल्या नाहीत. यावरूनच त्यांच्या कार्याची ओळख होऊन जाते. प्रभाकर देशमुख म्हणाले, काकांच्या निधनाने संस्थेत मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी ती पोकळी भरून काढण्याचे काम सुनिल पोळ सर्वांना बरोबर घेऊन करताना दिसून येत आहे. 

नरेंद्र पाटील म्हणाले, काकांच्यानंतर सुनील बापूंना बळ देण्याची गरज आहे. त्यांना राजेंचा राजाश्रय तर आहेच, पण सर्व सभासद ठेवीदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. सुनिल पोळ यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा दिला.  संचालिका निलिमाताई पोळ यांनी स्वागत केले. सभासदांच्या वतीने विरभद्र कावडे यांनी मनोगत व्यक्त केले. अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक महादेव गोंजारी यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com